लोकशाहीसंदर्भात जो आवाज उठवतो, त्याची नाकेबंदी केली जातेय, संजय राऊत कडाडले
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. संजय राऊत यांनी यावेळी लखीमपूर येथील घटनेवर भाष्य केलं. संजय राऊत यांनी काल राहुल गांधींना भेटल्याची माहिती दिली.
संदीप राजगोळकर, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. संजय राऊत यांनी यावेळी लखीमपूर येथील घटनेवर भाष्य केलं. उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेची तुलना राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालियनवाला बाग घटनेशी केली होती, ती तुलना योग्यच असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. जनतेच्या संतापाला वाट मोकळी करुन देणं हे विरोधकांचं काम असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी लखीमपूरला जाणार आहेत, त्यांनाही अडवलं जाईल, असं संजय राऊत म्हणाले. राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी नोटिस बजाविल्याची माझी माहिती आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. लोकशाहीसंदर्भात आवाज जो उठवतो, त्याची नाकेबंदी केली जाते, देशद्रोही ठरविले जाते, अशा प्रकारचा अवलंब होत असेल तर देशामध्ये नव्या प्रकारली गुलामगिरी सुरु झाली, अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.
लोकं जागी होत आहेत
उत्तर प्रदेशमध्ये ज्या काँग्रेसचं अस्तित्व संपल होतं, तिथे प्रियांकांच्या समर्थनार्थ मशाल मोर्चे निघत आहेत. ही एकप्रकारची जागरुकता होत असून लोकं जागी होत असल्याचं लक्षात येतेय, असं संजय राऊत म्हणाले. भविष्यात काय होईल, हे आता पाहावं लागेल, असं सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.
राहुल गांधीच्या भेटीत काय घडलं?
संजय राऊत यांनी काल राहुल गांधींना भेटल्याची माहिती दिली. भेटीत लखीमपूरविषयी चर्चा झाली, राजकीय चर्चाही झाली होती. लोकशाहीसंदर्भात आवाज जो उठवतो, त्याची नाकेबंदी केली जाते, देशद्रोही ठरविले जाते, अशा प्रकारचा अवलंब होत असेल तर देशामध्ये नव्या प्रकारली गुलामगिरी सुरु झाली, अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.
कन्हैया कुमार मुख्य प्रवाहात
कम्युनिस्ट नेते कन्हैया कुमार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं ते आता मुख्य प्रवाहात आलेले आहेत. कन्हैया कुमार यांनी काल भेट घेतली, त्यामध्ये विविध विषयांवर चर्चा केली, असं संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेचा दसरा मेळावा कसा होणार?
दसरा मेळाव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही. नियम आणि संकेतांचं पालन करुन दसरा मेळावा आयोजित करण्याची तयारी सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची देखील तीच इच्छा आहे. सध्या यासंबंधी चर्चा सुरु, अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील”
इतर बातम्या:
Breaking | पोटनिवडणुकीचा रणसंग्राम, कोण मारणार बाजी? TV9 वर सकाळी 9.30 वाजल्यापासून सुपरफास्ट निकाल
Sanjay Raut slam BJP over incidents happen in Uttar Pradesh Lakhimpur and Priyanka Gandhi Arrest