sanjay raut! आमची टांग वर झाल्यास भूमंडळ हालते; संजय राऊत यांचा इशारा

| Updated on: Nov 11, 2020 | 2:10 PM

आमची टांग नेहमी जागेवरच असते. जेव्हा आम्ही टांग वर करतो तेव्हा भूमंडळ हलते, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. (sanjay raut slams bjp over bihar election result)

sanjay raut! आमची टांग वर झाल्यास भूमंडळ हालते; संजय राऊत यांचा इशारा
Follow us on

मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. बिहार निवडणुकीत नोटापेक्षाही कमी मते शिवसेनेला मिळाले. शिवसेनेची अवस्था गिरे तो भी टांग उपर अशी आहे, या भाजपच्या टीकेचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. आमची टांग नेहमी जागेवरच असते. जेव्हा आम्ही टांग वर करतो तेव्हा भूमंडळ हलते, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. (sanjay raut slams bjp over bihar election result)

शिवसेना खासदार संजय राऊत यांननी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आमची टांग किंवा उंगली उपर नसते. आम्ही टांगेवरच असतो. जेव्हा टांगवर करतो तेव्हा भूमंडळ हलते, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला. शिवसेना राज्यात उत्तम सरकार चालवत आहे. पण बिहारमध्ये भाजपला काठावर बहुमत मिळाले आहे. जेव्हा काठावरचं बहुमत मिळतं तेव्हा हा आकडा वरखाली होत असतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपर्यंत बिहारमध्ये काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही, असं राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी बिहारमधील यशाचं श्रेय फडणवीस यांनाही दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारसभांमध्ये उडी घेतली. त्यामुळे भाजपचा आकडा वाढला. देवेंद्र फडणवीसही प्रभारी होते. मधल्या काळात ते रुग्णालयात होते. त्यांनी रुग्णालयातून काम केलं असेल. त्यामुळे या निवडणुकीतील यशाचं श्रेय मोदींचं जसं आहे. तसंच ते फडणवीसांचंही आहे, असं राऊत म्हणाले.

चिराग पासवान आघाडीत कसे?

यावेळी त्यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवरही बोट ठेवलं. एनडीएपासून वेगळं होऊन चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणूक लढवली. तरीही ते एनडीएचा घटक पक्ष कसे? असा सवाल करतानाच अर्थात हा एनडीएचा प्रश्न आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. चिराग पासवान यांना ठरवून वेगळं करण्यात आलं. पासवान यांनी स्वबळावर निवडणूक लढवली नसती तर नितीशकुमार यांच्या 20 जागा वाढल्या असत्या. पण नितीशकुमारांचे पंख कापायचे होते. त्यांचे वर उडणारे विमान खाली आणायचे होते. त्यामुळेच भाजपने चिराग यांना पुढे केल्याचा दावा राऊत यांनी केला.

तेजस्वी लोकसभेत परिवर्तन घडवतील

तेजस्वी यादव यांनी भाजप-जेडीयूला जेरीस आणलं. त्यांनी चांगली फाईट दिली. आज तेजस्वींना बिहारमध्ये मुख्यमंत्रिपद मिळू शकलं नाही. पण 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ते क्रांतिकारक काही घडवतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

 

संबंधित बातम्या:

तीन पक्षांचं सरकार पण काँग्रेसला बळकट करायचेय, बाळासाहेब थोरातांना बळ द्या: पृथ्वीराज चव्हाण

‘नितीशजी तेजस्वीला आशीर्वाद द्या, बिहारमधून बाहेर पडा; भाजपची साथ सोडून आमच्यासोबत चला’

बिहारमध्ये चुरशीच्या लढतीत एनडीएचा विजय, सर्वात मोठा पक्ष ठरुनही राजदचा पराभव

(sanjay raut slams bjp over bihar election result)