हे तर राजकारणातील सीरिअल रेपिस्ट, सीरिअल किलर; संजय राऊत यांचा घणाघात

भ्रष्टाचाराला खुलं समर्थन आणि संरक्षण या देशात कुणी दिलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 तासापूर्वी काय बोलतात अन् 24 तासानंतर महाराष्ट्रात काय घडतंय हे जगातील 33 देशाने पाहिलं आहे, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.

हे तर राजकारणातील सीरिअल रेपिस्ट, सीरिअल किलर; संजय राऊत यांचा घणाघात
sanjay raut Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 10:51 AM

मुंबई : शिवसेनेत फूट पाडल्यानंतर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसही फोडली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप विरोधी पक्षाचं अस्तित्वच नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपला विरोधकांची भीती वाटत असल्यानेच हा प्रकार सुरू आहे, अशी टीका आता भाजपवर होत आहे. राज्यातील या राजकारणावर सामान्य जनतेतून असंतोष व्यक्त होत आहे. या सर्व प्रकारावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. हे फोडाफोडी करणारे जसे सीरिअल रेपिस्ट असतात तसे हे राजकारणातील सीरिअल रेपिस्ट असल्याची खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. फुटलेल्या गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा करायला लावला. पक्षाचं नाव आणि चिन्हावर दावा करणं हे फुटलेल्या लोकांच्या मनात नव्हतं. यामागे दिल्लीचं डोकं होतं. त्यांना शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नाव महाराष्ट्रातून नष्ट करायचं होतं. तीच पद्धत त्यांनी राष्ट्रवादीबाबत अवलंबली. राष्ट्रवादी फुटली. पण त्याचवेळी त्यांनी या प्रमुख लोकांना पकडून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा करायला सांगितला.

हे सुद्धा वाचा

गुन्हेगारांचीही मोडस ऑपरेंडी सारखी आहे. एखादा सीरिअल किलरची जशी मोडस ऑपरेंडी सारखी असते. सीरिअल किलर आणि सीरिअल रेपिस्टची मोडस ऑपरेंडी जशी असते, तसे हे राजकारणातील सीरिअल रेपिस्ट आहेत. सीरिअर किलर आहेत. त्याच पद्धतीची ही मोडस ऑपरेंड आहे. पक्ष एकाच विशिष्ट आकड्यात फोडायचा आणि त्या गटाला पक्ष आणि चिन्हावर दावा करायला सांगायचा ही सेम पद्धत अवलंबली गेली आहे, असं संजय राऊत म्हणाले.

इतिहास पुसला जाणार नाही

त्यांना महाराष्ट्रातून बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं नाव नष्ट करायचं आहे. त्यानंतर शरद पवार आणि त्यांचं राजकारण नष्ट करायचं आहे. स्वत: काही करायचं नाही. जे स्वत: इतिहास घडवत नाही, ते दुसऱ्यांचा इतिहास नष्ट करत आहेत. महाराष्ट्रात ते सुरू आहे. महाराष्ट्रात तसे प्रयत्न सुरू आहे. पण तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी या महाराष्ट्रातून इतिहास पुसला जाणार नाही, असा इशाराच राऊत यांनी दिला आहे.

राजकारण यशस्वी होणार नाही

कायदेशीर बाब म्हणाल तर शिवसेनेने कायदेशीर लढाई जिंकली आहे. महाराष्ट्रात शिंदेंसह फुटलेले आमदार अपात्र होतील. तोच निकाल राष्ट्रवादीबाबत लागू शकतो. शंभर टक्के लागू पडेल. विधीमंडळ पक्षातील फूट म्हणजे पक्षाची फूट नाही, विधीमंडळ पक्ष म्हणजे मुख्य पक्ष नाही हे धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं आहे. त्यानंतर तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी हे राजकारण यशस्वी होणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

वेळ तुमच्यावरही येऊ शकते

कुठलं लोटस ऑपरेशन? त्यांचंच ऑपरेशन झालं. दोन्ही पक्षात फूट पडल्याने महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात भाजपच्या इज्जतीचं वस्त्रहरण झालं आहे. त्यांची वैचारिक सुंता झाली आहे. काल पर्यंत त्यांना तुरुंगात पाठवण्याची भाषा करत होते. मुलुंडचे पोपटलाल बोलत होते. आता तुम्ही जेवढं फुदकायचं तेवढं फुदका. भविष्यात ही वेळ तुमच्यावर येऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.