तक्रारी करून प्रसिद्धी मिळवणं हा राजकीय उद्योग; संजय राऊत यांनी मनसेची खिल्ली का उडवली?

सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही धडा शिकवणार. आमचे नेते आम्हाला मार्गदर्शन करतील, त्यानंतर रणनीती ठरेल. पोलिसांना त्यांचे काम करू देत.

तक्रारी करून प्रसिद्धी मिळवणं हा राजकीय उद्योग; संजय राऊत यांनी मनसेची खिल्ली का उडवली?
तक्रारी करून प्रसिद्धी मिळवणं हा राजकीय उद्योग; संजय राऊत यांनी मनसेची खिल्ली का उडवली? Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 18, 2022 | 11:13 AM

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातील भाजप आणि मनसे आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात अनेक ठिकाणी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्द्यावरून कार्यकर्त्यांना आक्रमक होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे मनसेही आक्रमक झाली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मात्र मनसेची खिल्ली उडवली आहे. हा प्रसिद्धी मिळवण्याचा राजकीय उद्योग असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. मनसेने राहुल गांधी यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. काही ठिकाणी तक्रारीही नोंदविल्या आहेत. त्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? असा सवाल राऊत यांना करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

मला त्यावर काही बोलायचं नाही. आपल्या देशात तक्रारी दाखल करणं आणि तक्रारीच्या आधारे प्रसिद्धी मिळवणं हा राजकीय उद्योग झालाय. आमच्याकडचे लोकं अनेकदा त्याचे राजकीय बळी ठरले आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा बुलढाण्यात पोहोचली आहे. मनसेच्या इशाऱ्यानंतर या यात्रेत पावलोपावली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या यात्रेत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हे सुद्धा राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत चालत आहेत.

राहुल गांधी आज सकाळपासून 8 किलोमीटरचा पल्ला गाठला. आज सायंकाळी 4 वाजता राहुल गांधी यांची शेगावमध्ये सभा पार पडणार आहे.

राहुल गांधी यांनी केलेल्या सावरकरांबाबतच्या वक्तव्यावर मनसेने उडी घेतली आहे. मनसेने राहुल गांधी यांच्या पदयात्रेला काळे झेंडे दाखवून, त्यांची शेगाव येथे होणारी सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसनेही त्यांना प्रति आव्हान दिलं आहे.

रोक सके तो रोकलो, हम तो काश्मीर जाके रहेंगे, असं आव्हानच काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मनसेला दिलं आहे.

दरम्यान, सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही धडा शिकवणार. आमचे नेते आम्हाला मार्गदर्शन करतील, त्यानंतर रणनीती ठरेल. पोलिसांना त्यांचे काम करू देत, आम्ही निषेध करणार हा आमचा अधिकार आहे, असं मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी सांगितलं.

राहुल गांधी त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटत नाहीत. सुरक्षेत असतात. राहुल गांधी सोबत आमनासामाना होऊ देत. मग त्यांना आम्ही सांगू, असा इशाराही देशपांडे यांनी दिला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.