Sanjay Raut : मिस्टर फडणवीस, तुम्ही माझ्यावर कितीही कारवाई करा, मी घाबरत नाही, तुमची सर्व कारस्थाने मला माहीत: राऊत
Sanjay Raut : ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे. ती महाराष्ट्राची भूमिका मांडत राहील. सकाळी नऊच काय आम्ही 24 तास बोलत राहू. आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत आहे. त्यांचाही हवा हवासा लाऊडस्पीकर आहे. उद्धव ठाकरेही बाहेर पडणार आहेत.
मुंबई: मिस्टर फडणवीस. तुम्ही माझ्यावर कोणतीही कारवाई करा. केंद्रीय तपास यंत्रणांची करा. सीबीआयची करा. किंवा अन्य कोणतीही करा. तुमची सर्व कारस्थाने मला माहीत आहेत. अँड आय एम रेडी टू फेस एनी अॅक्शन, असा इशाराच शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना दिला. राऊतांचा लाऊडस्पीकर रोज सकाळी उठून लागतो. तो आता कमी झाला आहे. राऊतांमुळेच आपलं सरकार आलं आहे, असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला होता. त्यावरही राऊत यांनी उत्तर दिलं. त्यांनाही रोज उठून माझा लाऊडस्पीकर ऐकावा लागतो. आम्ही तुमच्या पिपाण्या बंद केल्या. पण शिवसेनेचा (shivsena) लाऊडस्पीकर कोणी बंद करू शकत नाही. हा महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे, असं संजय राऊत म्हणाले. राऊत मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही टीका केली.
ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे. ती महाराष्ट्राची भूमिका मांडत राहील. सकाळी नऊच काय आम्ही 24 तास बोलत राहू. आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत आहे. त्यांचाही हवा हवासा लाऊडस्पीकर आहे. उद्धव ठाकरेही बाहेर पडणार आहेत. त्यांचीही गर्जना घुमणार आहे. हा लाऊडस्पीकर तुम्हाला बधीर केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.
फडणवीस खोटं बोलत होते
माझा लाऊडस्पीकरचा तुम्ही रोज ऐकता. पण तुमच्या पिपाण्या लोकांनी बंद केल्या. आम्हाला जे बोलायचं आम्ही निर्भीडपणे बोलतो. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंशिवाय शिवसेना होणार नाही, असं राऊत म्हणाले. फडणवीस कसं खोट बोलतं होते. सत्तेचं शेअरिंग 50-50 होणार असं फडणवीसांनी सांगितलं होतं. त्यात मुख्यमंत्रीपदही आलं. म्हणूनच फडणवीस यांचा व्हिडीओ मी ट्विट केला आहे. त्यामुळे ते उघडे पडले आहेत, असं ते म्हणाले.
सत्य हे सत्यच असतं
हे लोक खोटं बोलतात. माणूस बेमालूमपणे किती खोटं बोलू शकतो हे आपण काल पाहिलं. हे लोक असत्याला सत्याचा मुलामा देत आहे. पण सत्य हे सत्यच असतं. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. सरकार स्थापन केलं. त्यामुळे मराठी माणूस अस्वस्थ आहे. मराठी माणूस काय करू शकतो हे तुम्हाला येत्या काळात दिसेलच, असंही ते म्हणाले.