मुंबई: औरंगाबादमध्ये शिवसेनेची सभा होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thcakeray) हे या सभेला संबोधित करणार आहेत. त्यापूर्वीच मनसे आणि भाजपने या सभेवर टीका केली आहे. मनसेने (mns) ट्विट करून तर भाजपने औरंगाबादेत पोस्टर लावून टीका केली आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांवर हल्ला चढवला आहे. विरोधकांचं तोंड नसून गटार आहे. शिवसेनेच्या (shivsena) पक्षप्रमुखांविषयी व्यक्तीगत द्वेष असू शकतो. पण तुमच्या तोंडातून भिजलेले फटाके फुटत असतील तर त्याची पर्वा करत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. आजच्या सभेत फटाके फुटणार आहेत. पण लवंगी फटाका तरी फुटू द्या, अशी टीका विरोधकांनी केली आहे. त्याला राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. आजच्या सभेसाठी शिवसेनेने जोरदार तयारी केली आहे. या सभेला लाखो लोक उपस्थित राहणार असल्याचं मनसेने म्हटलं आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
37 वर्षापूर्वी औरंगाबादेत शिवसेनेची पहिली शाखा स्थापन झाली. त्या वर्धापन दिनानिमित्ताने सभा होत आहे. सभेची तयारी जोरात सुरू आहे. लाखो शिवसैनिक सभेला येणार आहेत. बऱ्याच काळानंतर मुंबईच्या बाहेर सभा होत आहे. त्यामुळे शिवसैनिकांना त्याचं आकर्षण आहे. बऱ्याच राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यावर उद्धव ठाकरे काय बोलतात याची उत्सुकता आहे. विरोधकांचं तोंड नसून गटार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याविषयी कसं बोलावं, काय बोलावं याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांविषयी व्यक्तीगत द्वेष असू शकतो. पण तुमच्या तोंडातून भिजलेले फटाके फुटत असतील तर त्याची पर्वा करत नाही, अशी टीका राऊत यांनी केली.
ब्राह्मण महासंघाने जे मुद्दे मांडले आहेत. त्याचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत. चेतन कांबळे यांच्या जाहिरातीबाबत मला आताच कळलं. त्याची माहिती घेणार आहे, असं राऊत म्हणाले.
शिवसेनेला हिंदुत्वाचा चेहरा म्हणून शिवेसना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावावा लागतो, अशी टीका मनसेने केली होती. त्यावरही त्यांनी पलटवार केला. बाळासाहेबांचा फोटो नाही लावायचा तर कुणाचा लावायचा? मनसेला बाळासाहेबांच्या फोटोची अॅलर्जी आहे का? तुम्हीही सुरुवातीच्या काळात त्यांचा फोटो लावत होता. त्यांच्याकडे काय लक्ष देता, अशा शब्दात त्यांनी मनसेला फटकारले.