दिलीपसाहेबांशिवाय चित्रपटसृष्टी म्हणजे नेहरु-गांधी, ठाकरे, वाजपेयी नसलेले हिंदुस्थानी राजकारण, सामनातून आदरांजली

'हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास म्हणजे दिलीप कुमार. तो इतिहास अजरामर आहे. त्यामुळे आज ज्यांनी जगाचा निरोप घेतला ते दिलीप कुमार नव्हतेच, ते तर युसूफ खान होते. दिलीप कुमार अमर आहेत', असं अग्रलेखात म्हटलंय. (Sanjay Raut tribure Dilip kumar Through Saamana Editorial)

दिलीपसाहेबांशिवाय चित्रपटसृष्टी म्हणजे नेहरु-गांधी, ठाकरे, वाजपेयी नसलेले हिंदुस्थानी राजकारण, सामनातून आदरांजली
संजय राऊथ आणि दिलीप कुमार
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 6:41 AM

मुंबई : भारतीय चित्रपष्टसृष्टीला पडलेलं एक गोड स्वप्न म्हणजे दिलीप कुमार… काल हे गोड स्वप्न लुप्त झालं. वयाच्या 98 व्या वर्षी सुहाना सफर करुन त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. आजच्या सामना अग्रलेखातून दिलीपसाहेबांच्या समग्र चित्रपट कारकीर्दीवर आणि त्यांच्या रुबाबदार, रोमँटिक, सुसंस्कृत व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकण्यात आलाय. ‘दिलीप कुमार नसलेली हिंदुस्थानी चित्रपटसृष्टी म्हणजे नेहरु-गांधी, ठाकरे, वाजपेयी नसलेले हिंदुस्थानी राजकारण आहे, अशा शब्दात दिलीप कुमार यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. (Sanjay Raut tribure Dilip kumar Through Saamana Editorial)

दिलीप कुमार म्हणजे अभिनयाच्या सल्तनतीचे बेताज बादशहा होते. ते केवळ सर्वश्रेष्ठ अभिनेतेच नव्हते तर अभिनयाची ती एक चालती बोलती संस्था होती. हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास म्हणजे दिलीप कुमार. तो इतिहास अजरामर आहे. त्यामुळे आज ज्यांनी जगाचा निरोप घेतला ते दिलीप कुमार नव्हतेच, ते तर युसूफ खान होते. दिलीप कुमार अमर आहेत!

दिलीप कुमार चित्रपटसृष्टीतील चमत्कार

जागतिक कीर्तीचे महान कलावंत दिलीप कुमार अर्थात युसूफ खान यांचे निधन म्हणजे चित्रपटसृष्टीतील एका प्रदीर्घ कालखंडाची अखेर आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यासाठी देशाच्या चित्रपटसृष्टीचा श्वासही काही काळ थांबला असेल. वयाच्या विशीत युसूफ खान या नावाचा एक तरुण चित्रपटसृष्टीत येतो आणि सरिता स्वतःचा मार्ग स्वतः बनविते त्याप्रमाणे प्रखर आत्मविश्वास, कलेवरील अढळ निष्ठा आणि प्रत्यक्ष काम चोखपणे पूर्णत्वाला नेण्याची जिद्द याची कास धरून आपले स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करतो. दिलीप कुमार हा चित्रपटसृष्टीतील एक चमत्कारच म्हणायला हवा.

दिलीप कुमारांशिवाय चित्रपटसृष्टी म्हणजे नेहरू-गांधी, ठाकरे, वाजपेयी नसलेले राजकारण

शंभरीपर्यंत पोहोचतानाच त्यांचे झालेले निधन म्हणजे परिपूर्ण जीवनाची समाप्ती आहे. गेली अनेक वर्षे ते कॅमेऱ्यासमोर आणि पडद्यावर नव्हते. तरीसुद्धा दिलीप कुमार नसलेली हिंदुस्थानी चित्रपटसृष्टी म्हणजे नेहरू-गांधी, ठाकरे, वाजपेयी नसलेले हिंदुस्थानी राजकारण आहे.

मोहरा आपल्यातून गेला हे मानायला मन तयार होत नाही

राजबिंडे रूप, जबरदस्त संवादफेक, अनेकदा सामान्यांचे प्रतिनिधित्व करणारा ‘अँग्री यंग मॅन’, तितकाच भावुक, प्रेमळ, त्यातून निर्माण झालेला ‘टॅजेडी किंग’ अशा विविध रूपांत दिलीप कुमारने हिंदुस्थानी सिनेसृष्टीचा पडदा व्यापला. ”मैने हमेशा अपने जूतों का साइज अपने पावसे बडा रखा है” असा डायलॉग फेकत चित्रपटांतून विजेचा करंट सोडणारा दिलीप कुमार म्हणजे हिंदुस्थानी सिनेसृष्टीचा मोहराच होता. हा ‘मोहरा’ आपल्यातून निघून गेला, हे मानायलाच मन तयार होत नाही.

दिलीप कुमार अजरामर आहेत, ते जातील कसे?

अभिनयाचा बेताज बादशहा असलेले दिलीप कुमार तर अजरामर आहेत. ते जातील कसे? मग पृथ्वीच्या पोटात जे निश्चेष्ट कलेवर आज दफन झाले, ते कुणाचे होते? जो शरीक-ए-खाक झाला, तो एक सर्वसामान्य देह होता इतरांसारखाच…आणि जो शरीक-ए-रूह आहे, ते असामान्य दिलीप कुमार येथेच आहेत. ते जिवंत आहेत पडद्यावर आणि लाखो-करोडो चाहत्यांच्या मनःपटलावर. या पडद्यावरून दिलीप कुमारांना कोण हटविणार? त्यांचे तुफान गाजलेले चित्रपट, अभिनयाची शैली व रसिकांच्या कानांत घर करून असलेली संवादफेक कोणाला हिरावून घेता येईल? गॉड, ईश्वर, अल्लाह या संकल्पना मनुष्यलोकातील एखादा देह नेऊ शकतील, पण दिलीप कुमार यांचा अदबशीर आणि जिवंत अभिनय घेऊन जाण्याची गुस्ताखी त्यांना तरी करता येईल काय?

दिलीप कुमार म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेलं एक सुंदर स्वप्न

दिलीप कुमार म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं. ते स्वप्न लौकिक अर्थाने आज लुप्त झाले असले, तरी सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा हा अढळ तारा भविष्यातही लकाकत राहील, चकाकत राहील. उत्तम नट होण्यासाठी अभिनयाच्या वाटेवर धडपडणाऱ्या, चाचपडणाऱ्या प्रत्येक कलाकारास फिल्म इंडस्ट्रीचा हा पहिला सुपरस्टार दीपस्तंभाप्रमाणे दिशादर्शन करत राहील.

अभिनयसंपन्न आणि सुसंस्कृत व्यक्तित्त्वाचं आयुष्य आकड्यात मोजायचं नसतं

दिलीप कुमार यांच्यासारख्या अभिनयसंपन्न आणि सुसंस्कृत व्यक्तित्त्वाचे आयुष्य तसे आकड्यात मोजायचे नसते. शंभरीच्या आसपास पोहोचलेले वयोमान, थकलेले शरीर, अल्झायमरसारखा असाध्य आजार पाठीमागे लागलेला असतानाही चित्रपटातील नायकाप्रमाणेच ते आजारपणाशी लढत राहिले. पत्नी सायरा बानो सदैव सावलीसारख्या त्यांच्यासोबत असायच्या. ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांच्या चित्रपटांतील शोकात्म शेवटाप्रमाणेच ही लढाई आज संपली.

फळविक्रेत्याचा मुलाचा विस्मयकारक प्रवास

पाकिस्तानातल्या पठाण कुटुंबातील फळविक्रेत्याचा मुलगा असलेल्या दिलीप कुमार यांचे खरे नाव युसूफ खान. पठाण या राकट अक्षराशी जराही साम्य नसलेला शांत व एकांतप्रिय युसूफ खान मुंबईत येतो, लहानाचा मोठा होतो, शिकतो, पुण्यामध्ये लष्कराच्या छावणीत कॅण्टीन चालवितो, तिथे बॉम्बे टॉकीजच्या देविका रानींची या तरुणावर नजर पडते, युसूफ खान हे नाव रोमँटिक हिरोला ‘सूट’ होणार नाही म्हणून त्याचे नाव बदलून दिलीप कुमार ठेवले जाते आणि तोच दिलीप कुमार फिल्म इंडस्ट्रीचा पहिला सुपरस्टार बनण्याचा इतिहास घडवितो. हा सगळाच प्रवास विस्मयकारक आहे.

दिलीपसाहेबांच्या अभिनयाचा परमोच्च बिंदू म्हणजे देवदास

पैशासाठी भाराभर चित्रपट साईन न करता दिलीप कुमार यांनी मोजकेच साठेक चित्रपट केले. प्रत्येक भूमिका केली ती जीव ओतूनच. त्यांच्या अभिनयाचा परमोच्च बिंदू म्हणजे देवदास! बिमल राय यांच्या या चित्रपटातील पारो व देवदास यांच्या प्रेमकहाणीत दिलीप कुमार यांनी सर्वस्व ओतले. त्यासाठी शरच्चंद्रांच्या मूळ कादंबरीची त्यांनी पारायणे केली. पारोवरचे अथांग पेम, तिच्या वियोगाची वेदना आणि तीच नसल्यामुळे निरर्थक बनलेले आयुष्य मद्याच्या पेल्यांत उद्ध्वस्त करून घेणारा देवदास दिलीप कुमार यांनी ज्या ताकदीने उभा केला आहे, तो रोमांचक आहे. ‘नटसम्राट’नंतर श्रीराम लागूंना जसा शोकात्म भूमिकेतून बाहेर पडताना त्रास झाला, तसाचा त्रास दिलीप कुमार यांना देवदास साकारताना झाला. दिलीप कुमार इतके सर्वस्व ओतून काम करायचे की, ते भूमिकेत न शिरता भूमिकाच त्यांच्यात शिरायची. त्यामुळेच ‘देवदास’नंतर त्यांना मानसोपचार घ्यावे लागले.

दिलीपसाहेबांचे हिट चित्रपट

‘हलचल’मधील त्यांचा शोकात्म अभिनय, ‘दाग’मधील व्यसनी शंकरची भूमिका अशीच शहारे आणणारी होती. ट्रॅजेडी किंगच्या शिक्क्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी नया दौर, आझाद, कोहिनूर या चित्रपटांत जिंदादिल नायकाच्या भूमिका केल्या. माणूस विरुद्ध यंत्र आणि गरीब विरुद्ध श्रीमंत या संघर्षात बंड करणारा, पेटून उठणारा टांगेवाला शंकर दिलीप कुमार यांनी उभा केला. ‘उडे जब जब जुल्फे तेरी…’सारख्या एकाहून एक सरस गाण्यांबरोबरच दिलीप कुमार यांच्या कसदार अभिनयामुळे ‘नया दौर’ सुपरहिट झाला. ‘राम और श्याम’ हा तर हिंदी चित्रपटसृष्टीतील दुहेरी भूमिका असलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट.

‘गंगा जमना’मधील रांगडा नायक पुढे हातात बंदूक घेऊन दरोडेखोर बनतो. एकाच चित्रपटातील हे स्थित्यंतर दिलीप कुमार यांनी अत्यंत प्रभावीपणे साकारले आहे. ‘दिदार’ चित्रपटात अंध नायकाची भूमिका करताना ही भूमिका हुबेहूब अंध व्यक्तीची वाटावी, यासाठी ते अंध लोकांसोबत राहिले. डोळ्यांतून व्यक्त होण्याचे अद्भुत कसब, चेहऱ्यावरील हावभाव आणि संवादफेकीवर असलेले कमालीचे प्रभुत्व ही दिलीप कुमार यांच्या अभिनयाच्या भात्यातील प्रमुख शस्त्रे होती.

‘मुगल ए आझम’मुळे दिलीपसाहेब लोकांच्या मनामनात

शिवाय अफाट वाचन आणि व्यासंगातून त्यांच्या अभिनयात एक निराळी खोली झळकत असे. मात्र, दिलीप कुमार यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळाली, ती ‘मुगल ए आझम’ या सुपरहिट चित्रपटामुळे. अनारकलीसोबत हळुवार प्रेम फुलविणारा राजपुत्र सलीम आणि या प्रेमकहाणीस कडाडून विरोध करणाऱ्या शहेनशहा बापाचे साम्राज्य लाथाडून संघर्ष करणारा प्रेमवीर कोण विसरु शकेल? नायक म्हणून ब्रेक घेतल्यानंतर क्रांती, शक्ती, कर्मा या चित्रपटांत चरित्र अभिनेता म्हणूनही त्यांनी जबरदस्त ठसा उमटवला.

पाकिस्तानचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर शिवसेनाप्रमुखांनी कठोर टीका केली!

दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण अभिनयाचे सर्वाधिक फिल्मफेअर पुरस्कार आजही दिलीप कुमार यांच्याच नावावर आहेत. काही काळ ते राज्यसभेचे सदस्यही होते. मूळ पाकिस्तानचे असलेल्या दिलीप कुमार यांना पाकिस्तान सरकारनेही ‘निशान-ए-इम्तियाज’ हा सर्वोच्च नागरी किताब दिला होता. पाकिस्तानचा हा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल शिवसेनाप्रमुखांनी दिलीप कुमार यांच्यावर कठोर टीका केली होती. मात्र, त्यानंतरही शिवसेनाप्रमुखांच्या मैत्रीत त्यांनी कधी अंतर पडू दिले नाही.

(Sanjay Raut tribure Dilip kumar Through Saamana Editorial)

हे ही वाचा :

Dilip Kumar Funeral | लाडक्या अभिनेत्याच्या शेवटच्या दर्शनासाठी शेकडोंची गर्दी, दिलीप कुमारांच्या अंत्यसंस्कारला सुभाष घईंची उपस्थिती

Dilip Kumar Throwback Photos : अमिताभ ते शाहरुख खान, बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांसोबत दिलीप कुमारांचे जवळचे संबंध, पाहा फोटो

PHOTO | दिलीप कुमार यांच्या अंत्यदर्शनाला मोजक्याच लोकांना परवानगी, शरद पवार-उद्धव ठाकरेंसह बॉलिवूडकरांनी घेतलं अंत्य दर्शन!

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.