आयुक्तांच्या लेटरबॉम्बनंतर ठाकरे सरकार अडचणीत; संजय राऊतांचं सूचक ट्विट
2019मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात रंगलेल्या सत्तानाट्यावेळीही संजय राऊत अशाचप्रकारे दररोज सूचक शेरोशायरी करताना दिसले होते. | Sanjay Raut
मुंबई: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir singh) यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर ठाकरे सरकार मोठ्या अडचणीत सापडले आहे. परमबीर सिंह यांचे हे पत्र प्रसारमाध्यमांच्या हाती लागल्यानंतर एकच गदारोळ झाला. त्यामुळे ठाकरे सरकार कधी नव्हे इतक्या मोठ्या संकटात सापडले आहे. या पार्श्वभूमीवर आता महाविकासआघाडीचे शिल्पकार आणि शिवसेनेचे संकटमोचक असलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सूचक संदेश ट्विट केला आहे. (Shivsena leader Sanjay Raut tweet after Parambir singh letter bomb)
संजय राऊत यांनी रविवारी आपल्या जावेद अख्तर यांचा एक शेर ट्विट केला. राजकीय वर्तुळात या ट्विटची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. संजय राऊत यांना या माध्यमातून नेमका काय संदेश द्यायचा आहे, यावरुन तर्कवितर्क लढवले जात आहेत.
2019मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात रंगलेल्या सत्तानाट्यावेळीही संजय राऊत अशाचप्रकारे दररोज सूचक शेरोशायरी करताना दिसले होते. त्यामुळे आताही ठाकरे सरकार काही अनपेक्षित चाल खेळणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
शुभ प्रभात… pic.twitter.com/lKWKS9pFkf
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 21, 2021
केंद्र सरकारने KGB किंवा CIA आणली तरी फरक पडत नाही: संजय राऊत
परमबीर सिंह यांचे पत्र समोर आल्यानंतर शनिवारी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलायला स्पष्ट नकार दिला होता. मला या विषयासंदर्भात काही माहिती नाही. हा सरकारसंदर्भातील विषय आहेत. त्यामुळे सरकारमधील लोकच यावर बोलतील, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.
मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) जाणार असल्याचा राज्य सरकारला कोणताही धक्का बसलेला नाही. मुंबई पोलीस, दहशतवादी विरोधी पथक अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करण्यास सक्षम असताना या प्रकरणांमध्ये एनआयएने घाईघाईत येण्याची गरज नव्हती. केंद्रातील भाजप सरकार राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी संधी शोधत आहे. परंतु त्यांनी अगदी ‘सीआयए’, ‘केजीबी’ला आणले तरी राज्य सरकारला फरक पडणार नसल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले होते.
संबंधित बातम्या:
Parambir Singh Letter : परमबीर सिंग यांच्या ‘लेटर बॉम्ब’ची राज्य सरकारकडून शहानिशा होणार!
(Shivsena leader Sanjay Raut tweet after Parambir singh letter bomb)