चिखलात लोळण्याचा कार्यक्रम वक्तशीर झाला, बर्नार्ड शॉ वाचण्यासाठी दोघांनाही उशीर झाला:संजय राऊत

शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत गेले महिनाभर सुरु असलेल्या आर्यन खान प्रकरण, एनसीबी आणि आरोप प्रत्यारोपांवरुन सुरु असलेल्या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

चिखलात लोळण्याचा कार्यक्रम वक्तशीर झाला, बर्नार्ड शॉ वाचण्यासाठी दोघांनाही उशीर झाला:संजय राऊत
संजय राऊत, शिवसेना खासदार
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 11:14 AM

नवी दिल्ली: शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत गेले महिनाभर सुरु असलेल्या आर्यन खान प्रकरण, एनसीबी आणि आरोप प्रत्यारोपांवरुन सुरु असलेल्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. संजय राऊत यांनी ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांच्या कवितेच्या ओळी ट्विट करत भाष्य केलं आहे.

बर्नार्ड शॉ वाचण्यासाठी दोघांनाही उशीर

संजय राऊत यांनी रामदास फुटाणे यांच्या चिखल या कवितेतील ओळी शेअर करत नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांना काव्यातून सूचक इशारा दिलाय.

संजय राऊत यांचं ट्विट

आम्ही कुसुमाग्रज वाचतो

आम्ही कुसुमाग्रज वाचतो, वसंत कानिटकर यांचं साहित्य वाचतो. कधी कधी बर्नाड शॉ चाळत असतो. यावेळेचं नाशिकला होणार साहित्य संमेलन बहारदार होईल. चिखलात कोण लोळतंय, चिखलफेक कोणी सुरुवात केली हे महाराष्ट्राला माहिती आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळानं नवाब मलिक यांच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, हे सगळं सुरु आहे त्याकडे देशातून पाहिलं जातं. त्यामुळे किती काळ चालणार हे मी म्हणालो. मात्र, शेवटी सत्याचाच विजय होतो, असं संजय राऊत म्हणाले.

नवाब मलिकांचे हल्ले जोरदार पण थांबायला हवेत

महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय वादावरं संजय राऊत यांनी काल दिल्लीत बोलताना हे सगळं वरिष्ठ नेत्यांनी थांबवलं पाहिजे, असं म्हटलं होतं. महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत त्याकडं लक्ष दिलं जावं त्यामुळं हे कुठतरी थांबलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले होते.

देवेंद्र फडणवीसांचा ट्विट करुन प्रत्युत्तर न देण्याचा पवित्रा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी नवाब मलिक यांना आव्हान देत बॉम्ब फोडणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप केला होता. नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर देत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी आणि गृहमंत्रीपदावर असताना बनावट नोटांच्या प्रकरणांना संरक्षण दिल्याचा आरोप केला होता. यावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत एक प्रकारे उत्तर देण्याचं टाळलं होतं. तर, नवाब मलिक यांनी माझी लढाई भाजप किंवा एनसीबी विरोधात नसल्याचं म्हणत त्यांची पुढील दिशा स्पष्ट केली होती.

इतर बातम्या:

औरंगाबादः विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून संजय केणेकरांना उमेदवारी, 29 नोव्हेंबर रोजी होणार मतदान

VIDEO: मच्छर आणि थंडीचा मारा सोसत पडळकर, खोत रात्रभर आझाद मैदानात; एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच

Sanjay Raut tweet lines from poem of Ramdas Futane row over Devendra Fadnavis and Nawab Malik

Non Stop LIVE Update
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.