बाळासाहेब, पवारांचे बोट धरून पुढे आलो; पवारांचे वय मोजू नये: संजय राऊत
पवार हे देशाचे नेते आहेत. भविष्यात त्यांना राष्ट्रीयस्तरावर मोठी संधी प्राप्त होवो, अशी अपेक्षा व्यक्त करतो, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. (Sanjay Raut Wishes sharad pawar On His Birthday)
मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे बोट धरून आम्ही पुढे आलोय. पवारांकडून आम्ही रोज प्रेरणा घेतोय. त्यांचे वय कोणी मोजू नये, असं सांगत पवार हे देशाचे नेते आहेत. भविष्यात त्यांना राष्ट्रीयस्तरावर मोठी संधी प्राप्त होवो, अशी अपेक्षा व्यक्त करतो, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. (Sanjay Raut Wishes sharad pawar On His Birthday)
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ऐंशीवा वाढदिवस आहेस. त्यानिमित्ताने संजय राऊत यांनी पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचं भरभरून कौतुक केलं. पवारांकडून आम्हाला सतत प्रेरणा मिळत असते. त्यांचे बोट धरूनच आम्ही राजकारणात आलो आहोत. गेल्या पाच पिढ्यांना शरद पवार प्रेरणा देत आहेत. त्यामुळे त्यांच्या वयाचा कोणी हिशोब करू नये. ते त्यांच्यावर अन्याय करणारं ठरेल. सगळे तरुण फिके पडतील अशा प्रकारचं काम ते आजही करत असतात. त्यांच्याकडून आम्ही रोज प्रेरणा घेत असतो. त्यामुळेच त्यांच्या वयाचा हिशोब करणं हा त्यांच्यावर अन्याय ठरेल, असं राऊत म्हणाले.
राष्ट्रायस्तरावर मोठी संधी मिळो
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचं बोट धरून आम्ही राजकारणात आलो. अनेक तरुण पुढे आलेत. ते सतत तरुणांच्या पाठी उभे राहतात. ते अनेकांचे आधार आहेत. त्यांच्याबाबतच्या आठवणी सांगाव्या तेवढ्या कमीच आहेत, असं सांगतानाच पवार हे राष्ट्रीय नेते आहेच. पण त्यांना राष्ट्रीयस्तरावर आणखी मोठी संधी मिळो, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
‘सामना’ अग्रलेखातून स्तुती
शिवसेनेने शरद पवार यांच्यावर ‘सामाना’तून अग्रलेख लिहिला असून त्यात त्यांची स्तुतीही करण्यात आली आहे. 80 वर्षांचे होऊनही शरद पवार यांचे वय वाढलेच नाही असा त्यांचा उत्साह आजही दिसतोय. खऱ्या अर्थाने लोकप्रिय, संघटना कुशल, राज्याचे व देशाचे प्रश्न उत्तम तऱ्हेने जपणाऱ्या, मोदींपासून क्लिंटनपर्यंत संबंध ठेवणाऱ्या, सुस्वभावी, स्नेह आणि शब्द जपणाऱ्या, हत्तीची चाल आणि वजिराचा रुबाब असलेल्या शरद पवार यांचे पुढील आयुष्य हे गंगा-यमुनेची विशालता आणि हिमालयाची उत्तुंगता गाठणारे होवो, हीच शुभेच्छा!, अशा शुभेच्छा ‘सामना’ अग्रलेखातून देण्यात आल्या आहेत. (Sanjay Raut Wishes sharad pawar On His Birthday)
Sharad Pawar Birthday : ‘वय वर्षे 80 असलेले पवार हे ज्येष्ठ आहेत की तरुण, या संभ्रमात अनेक वर्षे देश आहे’https://t.co/nWxk2Plfol@ShivSena @PawarSpeaks @NCPspeaks @rautsanjay61 @dhananjay_munde @INCMaharashtra #SharadPawar #sharadpawarbirthday
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 12, 2020
संबंधित बातम्या:
Sharad Pawar Birthday | विरार का छोरा, करणार परळीचा दौरा!
UPA अध्यक्षपदासाठी पवारांच्या नावाची सगळीकडे चर्चा, पण खुद्द पवार काय म्हणतायत?
‘वय वर्षे 80 असलेले पवार हे ज्येष्ठ आहेत की तरुण, या संभ्रमात अनेक वर्षे देश आहे’
(Sanjay Raut Wishes sharad pawar On His Birthday)