Video : सुनील राऊत फोनवर, संजय राऊतांनी खिडकीतून हात उंचावताच शिवसैनिकांचा एकच जल्लोष..! नेमके काय घडले ‘मैत्री’ बंगल्यावर?
गेल्या चार तासांपासून ईडी चे अधिकारी हे संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करीत आहेत. ई़डीचे 10 अधिकारी हे मैत्री बंगल्यामध्ये आहेत तर हजारो शिवसैनिक हे गेटवर आहेत. या दरम्यान, संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी खिडकीमध्ये येऊन बाहेरचे वातावरण जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता तर ते बराच वेळ फोनवर बोलत असल्याचेही पाहवयास मिळत होते.
मुंबई : रविवारची सकाळ उजाडली ती (Sanjay Raut) संजय राऊत यांच्या घरी (ED) ‘ईडी’चे अधिकारी या बातमीने. त्यांच्या मैत्री या खासगी बंगल्यावर 10 अधिकाऱ्यांची फौज दाखल झाली आहे. शिवाय बरोबर सुरक्षा रक्षक यामुळे नेमके काय होणार याकडे सबंध राज्याचे लक्ष लागले होते. संजय राऊतांना अटकही होऊ शकते अशा चर्चांना उधाण आले आहे. याच दरम्यान, संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे सातत्याने खिडकीतून डोकावून बाहेरच्या वातावरणाचा अंदाज घेत होते. मात्र, याच वेळी जेव्हा खा. संजय राऊत यांनी खिडकीतून हात उंचावले त्यावेळी बंगल्याबाहेर असल्याले (Shivsainik) शिवसैनिकांनी एकच जल्लोष केली. संजय राऊत आगे बढो..हम तुम्हारे साथ है..! या घोषणांचा खऱ्या अर्थाने स्विकार करीत राऊतांनीही हात उंचावत सर्वकाही सुरळीत असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तब्बल तीन तासानंतर राऊत माध्यमासमोर आणि शिवसैनिकांसमोर येता एकच जल्लोष झाला होता.
चार तासांपासून चौकशी सुरु
गेल्या चार तासांपासून ईडी चे अधिकारी हे संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करीत आहेत. ई़डीचे 10 अधिकारी हे मैत्री बंगल्यामध्ये आहेत तर हजारो शिवसैनिक हे गेटवर आहेत. या दरम्यान, संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी खिडकीमध्ये येऊन बाहेरचे वातावरण जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता तर ते बराच वेळ फोनवर बोलत असल्याचेही पाहवयास मिळत होते. 10 अधिकाऱ्यांकडून चौकशी आणि गेटवर सुरक्षा रक्षक याचा अंदाज काय असा सवाल उपस्थित राहत आहे.
अन् शिवसैनिकांचा एकच जल्लोष..
जोपर्यंत सुनील राऊत हे खिडकीत होते तोपर्यंत घोषणा आणि ईडीच्या कारवाईवर शिवसैनिकांनी बोट ठेवले होते. सकाळपासून दोन ते तीन वेळा सुनील राऊत हे माध्यमांच्या कॅमेरात टिपले गेले होते. मात्र, 11 वाजण्याच्या सुमारास जेव्हा खा. संजय राऊत हे खिडकीमध्ये आले तेव्हा शिवसैनिकांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्या जयघोष केला. अचानक संजय राऊतांची एन्ट्री झाल्याने शिवसैनिकांमध्ये आनंद संचारला होता तर राऊतही आपल्या स्टाईलमध्ये हात उंचावून अभिवादन करीत होते.
अन् राऊत परतले..
शिवसैनिकांचा उत्साह हा राऊतांना खिडकी सोडू देत नव्हता. कार्यकर्त्यांच्या घोषणा आणि राऊतांचे हात उंचावणे हे सुरु असताना त्यांना कोणीचे तरी बोलावणे आले त्यामुळे राऊत पुन्हा आतमध्ये गेले. मात्र, गेल्या 4 तासापासून चौकशी सुरु असतानाही बंगल्याबाहेर काय चालू आहे? शिवसैनिक किती संख्येने जमा झाले आहेत? हे पाहण्याचा मोह राऊतांनाही आवरता आला नाही. अवघ्या काही मिनिटांचा हा प्रसंग असला तरी या दरम्यानच्या काळात परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला होता.