पवारांचा भाजप नेत्याकडून एकेरी उल्लेख, राऊत म्हणतात, यांच्या डोक्याची चौकशी करा!

महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका सुरु आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही चंद्रकांत पाटलांवर हल्ला चढवलाय. यांची डोकी ठिकाणावर आहेत का याची चौकशी होणं गरजेचं आहे, असं संजय राऊत म्हणाले.

पवारांचा भाजप नेत्याकडून एकेरी उल्लेख, राऊत म्हणतात, यांच्या डोक्याची चौकशी करा!
संजय राऊत, चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Oct 17, 2021 | 1:07 PM

सिल्वासा : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका सुरु आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही चंद्रकांत पाटलांवर हल्ला चढवलाय. यांची डोकी ठिकाणावर आहेत का याची चौकशी होणं गरजेचं आहे, असं संजय राऊत म्हणाले. ते आज सिल्वासामध्ये बोलत होते. (Sanjay Raut’s reply to Chandrakant Patil’s criticism of Sharad Pawar)

‘काल मी पाहिले महाराष्ट्र भाजपचे एक नेते शरद पवारांचा उल्लेख अरे-तुरे, एकेरी भाषेत करीत होते ही राज्याची परंपरा नाही आम्ही मोदी साहेबांचा उल्लेख किंवा अमित शाह यांच्याविषयी कधी असे बोलत नाही. अटलजी आमचे श्रद्धास्थान राहिले आहेत. आडवाणी यांना आजही मानतो. आपल्यापेक्षा वय, अनुभव आणि विचारांनी मोठे असलेल्यांचा कायम आदर करावा. विचारांची लढाई विचारांनी करावी आणि पराभव करावा हे आम्हाला महाराष्ट्राने शिकवले…तुम्ही काल राजकारणात आलेली लोक शरद पवार यांचा उल्लेख एकेरी करता म्हणून मी म्हणतो यांची डोकी ठिकाणावर आहेत का याची चौकशी होणे गरजेचे…मेडिकल आणि नार्को पद्धतीने सुद्धा!’, अशी खोचक टीका राऊत यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

सांगलीमध्ये एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी शब्दात टीका केली होती. राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण 54 आमदाराच्या वर आम्ही त्याला जाऊ दिलं नाही. सगळं आयुष्य गेलं पण कधी 60 वर तो गेला नाही, असं वक्तव्य पाटील यांनी केलं होतं. तर देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना, त्यांच्या नेतृत्वाने राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. सांगलीतील नेत्याला वाटत होतं की आमच्याशिवाय पर्याय नाही. पण भाजपा कार्यकर्त्यांनी इथं यश मिळवून दाखवलं होतं. मी कीय त्या नेत्याचं नाव घेणार नाही. माझ्यावर केसेस सुरु आहेत, मी फकीर आहे, मी काय घाबरत नाही, असं पाटील म्हणाले होते.

संजय राऊत प्रचारासाठी सिल्वासामध्ये

मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यामुळे दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी संजय राऊत सध्या सिल्वासामध्ये आहेत. त्यावेळी बोलताना राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ‘दादरा – नगर हवेलीत प्रशासक ठरवतो कोणी कोणत्या राजकीय पक्षाचे काम करायचे ते. जसे आमच्या महाराष्ट्रात राज्यपाल ठरवतात. तुम्ही आमच्या पक्षाचे नाहीत, मग तुमच्या फायलींवर मी सही नाही करणार, हा एक नवीन प्रथा पायंडा सुरू झालाय’, अशी टीका राऊतांनी केलीय.

‘देशात किंवा महाराष्ट्रात गांजाचे पीक निर्माण झाले आणि काही लोक गांजा मारून काम करतात. हे दिसतेय… दसरा मेळाव्यानंतर मला वारंवार दिसतेय की विरोधी पक्ष वारंवार पणे बेताल बोलतोय त्या सगळ्यांची नार्को टेस्ट केली पाहिजे. हे जे NCB आहे त्यांनी बेताल बदबडणाऱ्यांची टेस्ट केली पाहिजे की ते काही मारतात का ? त्यांना कुणी पुरवते का?’ असा सवालही त्यांनी केलाय.

इतर बातम्या :

Video : काल पवार म्हणाले, पंकजा मुंडे एवढ्या मोठ्या नेत्या नाहीत, आता दिल्लीला जाता जाता पंकजांचं उत्तर

‘परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु’, रोहित पवारांचा सरकारला घरचा आहेर

Sanjay Raut’s reply to Chandrakant Patil’s criticism of Sharad Pawar

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.