‘फडणवीसांच्या ऐकण्यात आणि पाहण्यात काहीतरी दोष’, संजय राऊतांचा पलटवार; खोटं न बोलण्याचाही सल्ला!

पोलिसांनी जवाब नोंदवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. यावेळी फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही हल्ला चढवलाय. फडणवीसांच्या या टीकेला आता संजय राऊत यांनीही ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलंय.

'फडणवीसांच्या ऐकण्यात आणि पाहण्यात काहीतरी दोष', संजय राऊतांचा पलटवार; खोटं न बोलण्याचाही सल्ला!
संजय राऊत, देवेंद्र फडणवीसImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 5:07 PM

मुंबई : पोलिस बदल्यांचा घोटाळा प्रकरणात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मुंबई पोलिसांकडून जवाब नोंदवण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजलीय. भाजपच्या नेत्यांनी राज्यभरात पोलिसांच्या नोटिशीची (Police Notice) होळी करत फडणवीसांवर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध केलाय. दरम्यान, पोलिसांनी जवाब नोंदवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. यावेळी फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही हल्ला चढवलाय. फडणवीसांच्या या टीकेला आता संजय राऊत यांनीही ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलंय.

फडणवीसांच्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीस यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. ‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ऐकण्यात व पहाण्यात काही तरी दोष निर्माण झालाय. संजय राऊत मर्द शिवसैनिक आहे. घाबरण्याचा प्रश्नच नाही. केंद्रीय तपास यंत्रणा किती खोटे पणाने कारवाया करतात याचा पोलखोल करण्यासाठी मी दोन पत्रकार परिषद घेतल्या.पुराव्यासह. इतकेही खोटे बोलू नका’, असा सल्लाही राऊत यांनी फडणवीसांना दिलाय.

फडणवीसांची नेमकी टीका काय?

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केलीय. ‘मी खुलेपणाने बोललो की मी चौकशीला जायला तयार आहे. संजय राऊत रोज घाबरून पत्रकार परिषद घेतात. रोज केंद्रीय तपास यंत्रणांवर आरोप करतात. मी तर सांगितलं की मी यायला तयार आहे. कुठे बोलवायचं तिथे बोलवा. त्यांच्यात हिंमत आहे का? ते रोज पत्रकार परिषदेत म्हणतात मला का बोलावलं? मला का बोलावलं? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहजे’, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय.

म्हणून मला नोटीस दिली- फडणवीस

‘मला पोलिसांनी प्रश्नावली दिली होती. मी उत्तर देणार असल्याचं सांगितलं. काल त्यांनी हजर राहण्याची नोटीस पाठवली. मी सभागृहात रोज विषय मांडत आहे. या सरकारच्या मंत्र्याचं दाऊद कनेक्शन, विरोधी पक्षासोबतचं षडयंत्रं याबाबत मी वारंवार बोलत आहे. त्यामुळे त्यांनी मला नोटीस पाठवली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मी कालच सांगितलं मी जाणार आहे. मग सरकार आणि पोलिसांकडून विनंती केली आम्ही आपल्याकडे चौकशीसाठी येतो. आमचा स्टाफ पाठवतो. त्यानुसार ते आले’, असं फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले.

इतर बातम्या :

‘देवेंद्र फडणवीस यांनी एकच बॉम्ब फोडला, असे अनेक शस्त्र पुढे बाहेर निघतील’, चंद्रशेखर बावनकुळेंचा सरकारला इशारा

Video – Akola | प्रकाश आंबेडकरांनी घेतला देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार, सामान्य माणसाच्या भाषेत आक्षेपार्ह विधान

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.