Hemant Godse : संजय राऊतांचं बोलणं आवरा, राऊतांच्या बोलण्यामुळं काहींचं परतणं थांबलं, हेमंत गोडसेंचा गौप्यस्फोट

आत्ता जो संघर्ष आहे, तो सत्तेसाठी नसून विकासासाठी आहे.

Hemant Godse : संजय राऊतांचं बोलणं आवरा, राऊतांच्या बोलण्यामुळं काहींचं परतणं थांबलं, हेमंत गोडसेंचा गौप्यस्फोट
संजय राऊत, हेमंत गोडसे,
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 5:40 PM

नाशिक : नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर नाशिकमध्ये (Nashik) परतले. यावेळी त्यांनी चांगलेच शक्तीप्रदर्शन केलं. नवी दिल्लीत शिवसेनेच्या 12 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर पहिल्यांदा नाशिकमध्ये परतल्यावर खासदार गोडसे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना हेमंत गोडसे यांनी संजय राऊतांवर प्रहार केला. गोडसे म्हणाले, एखाद्या टोपलीत जे सडका कांदा असेल तो बाजूला काढून ठेवला तर बाकीचे कांदे वाचतील असं खासदारांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. बोललं पाहिजे, बोलायला हरकत नाही. पण कधी महागाई (inflation), पूर, लोकांचे हाल यावर बोलले का? संजय राऊत यांना कमी बोलायला लावा. कारण त्यामुळे जनता आणि आपलेच लोक नाराज होतात, असं उद्धव ठाकरेंना खासदारांनी सांगितलं होतं. काहींना परत येण्याची इच्छा होती. पण राऊतांच्या बोलण्यामुळे ते थांबले, ही वस्तुस्थिती आहे. असा गौप्यस्फोट (secret explosion) हेमंत गोडसे यांनी केला.

संघर्ष सत्तेसाठी नसून विकासासाठी

हेमंत गोडसे म्हणाले, 2007 साली जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकीय सुरुवात केली. त्यावेळी बांधकाम व्यवसाय बाजूला ठेवून लोकांना न्याय देण्यासाठी काम केलं. 2014 मध्ये खासदारकीची संधी दिली. त्यावेळी 1 लाख 87 हजारांच्या मताधिक्याने निवडून आलो. आत्ता जो संघर्ष आहे, तो सत्तेसाठी नसून विकासासाठी आहे.

विकासकामांचा वाचला पाढा

यावेळी गोडसे यांनी त्यांनी केलेल्या विकासाचा पाढा वाचला. ते म्हणाले, राजधानी एक्स्प्रेसला नाशिकला थांबा दिला. नाशिक एअरपोर्टहून विमानसेवा सुरू केली. राष्ट्रीय महामार्गावर फ्लायओव्हर उभारले. कुंभमेळा आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून दिला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वाडा नीट केला. स्पर्धा परीक्षा केंद्र उभारलं. कांद्यावर संसदेत आंदोलन केलं. कोव्हिड काळात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक कोटी रुपयांची टेस्टिंग लॅब उभारली. त्यात लाखो लोकांच्या टेस्ट झाल्या. ऑक्सिजनची कमतरता असताना तातडीने ऑक्सिजनचे 3 प्लँट उभारले. नाशिककरांसाठी बंगलोरहून रेमडेसिवीर मागवले. नाशिकसाठी पहिल्या किसान रेलची सुरुवात केली. त्र्यंबक निवृत्तीनाथ मंदिराच्या प्रसाद केंद्रासाठी 15 कोटी रुपये दिले. अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोप वे उभारण्याचं काम केल्याचंही गोडसे यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.