Hingoli : संतोष बांगरांवर निशाणा साधायचाय, पण ‘गोळ्या झाडणाऱ्या’ सेनेतच दुफळी, नाराजी नाट्य तुमच्यापर्यंत पोहोचलं?

जिल्ह्यातील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी सेनेतून बंड करुन घेतलेल्या भूमिकेचा वचपा काढण्यासाठी थेट पक्षप्रमुखांपासून ते स्थानिकांपर्यंतची यंत्रणा कामाला लागलेली आहे. याकरिताच माजी आमदार संतोष टारफे आणि शेतकरी नेते अजित मगर यांना शिवबंधन बांधण्यात आले आहे. त्यानंतर संघटनात्मक बदल करण्यासाठी जिल्हा प्रमुख म्हणून विनायक भिसे आणि संदेश देशमुख यांची वर्णी लागलेली आहे.

Hingoli : संतोष बांगरांवर निशाणा साधायचाय, पण 'गोळ्या झाडणाऱ्या' सेनेतच दुफळी, नाराजी नाट्य तुमच्यापर्यंत पोहोचलं?
हिंगोली येथे नवनियुक्त जिल्हा प्रमुखांनी शिवसैनिकांची बाैठक घेतली मात्र, यातही नाराजीचा सूर होता.
Follow us
| Updated on: Sep 01, 2022 | 6:04 PM

हिंगोली : बंडानंतर हिंगोलीचे (Santosh Bangar) आमदार संतोष बांगर हे चांगलेच चर्चेत आले आहेत. कधी शिवसेना विरोधातील वक्तव्य तर कधी शासकिय अधिकाऱ्यांना केलेली शिवीगाळ. बंडखोर आमदारांना आगामी निवडणूकीत धडा शिकवण्याचा निर्धारच शिवसेना पक्षप्रमुखांनी केला आहे. संतोष बांगर यांची कळमनुरी मतदार संघात कोंडी करण्यासाठी (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख यांनी माजी आमदार संतोष टारफे आणि शेतकरी नेते अजित मगर यांना शिवबंधनही बांधले. त्यामुळे तगडे आव्हानही उभे राहिले असले तरी दिलेले आव्हान यशस्वी करण्यासाठी आवश्यक असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या साखळीचा मेळ अद्यापही लागत नाही. संघटनात्मक पाया मजबूत झाला तरच हे सर्वकाही यशस्वी होणार आहे. पण नव्याने निवडण्यात आलेल्या जिल्हा प्रमुखांबद्दल येथील (Shivsainik) शिवसैनिकांमध्ये मतभेद आहेत. त्याारमुळे आणखी एक जिल्हाप्रमुख निवडावा अन्यथा आम्ही वेगळा मार्ग स्विकारु असा इशाराच शिवसैनिकांनी दिला आहे. त्यामुळे पक्षातील बंडाबरोबरच नाराजांनाही थोपवण्याचे मोठे आव्हान पक्षप्रमुखांसमोर आहे.

हिंगोलीच केंद्रस्थानी..!

जिल्ह्यातील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी सेनेतून बंड करुन घेतलेल्या भूमिकेचा वचपा काढण्यासाठी थेट पक्षप्रमुखांपासून ते स्थानिकांपर्यंतची यंत्रणा कामाला लागलेली आहे. याकरिताच माजी आमदार संतोष टारफे आणि शेतकरी नेते अजित मगर यांना शिवबंधन बांधण्यात आले आहे. त्यानंतर संघटनात्मक बदल करण्यासाठी जिल्हा प्रमुख म्हणून विनायक भिसे आणि संदेश देशमुख यांची वर्णी लागलेली आहे. मात्र, ही निवड मान्य नसल्याचे म्हणत जिल्ह्यात अन्य एकाला या पदावर नियुक्त करावे. त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करु असाच सूर येथील शिवसैनिकांचा आहे. त्यामुळे जिल्हा प्रमुखांची निवड झाली पण पक्ष संघटनेचे काय हा सवाल सेनेसमोर कायम आहे.

बैठकीतच उमटला नाराजीचा सूर

उद्धव ठाकरे यांनी हिंगोली जिल्हाप्रमुख पदी विनायक भिसे आणि संदेश देशमुख यांची निवड केली होती. त्यानुसार या दोघांनी हिंगोली येथे दाखल होताच शासकीय विश्रामगृहात शिवसैनिकांची बैठक घेतली. पण निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून नवीन पक्षात आलेल्यांनाच पक्ष नेतृत्वाने संधी दिल्याचा सूर उमटला. यांची निवड मान्य नाही तर जे सुरवातीच्या काळापासून पक्षाचे काम करीत आहेत, त्यांच्यावरच जिल्हा प्रमुख पदाची जाबाबदारी असावी असा आग्रह शिवसैनिकांनी धरलेला आहे. त्यामुळे आता शिवसैनिकांची ही नाराजी कशी दूर केली जाते हे पहावे लागणार आहे.

अन्यथा वेगळा मार्ग..

किमान आता तरी कट्टर शिवसैनिकांना न्याय मिळणे गरजेचे आहे. पक्षातून बंड झाले असतानाही अनेक निष्ठावंतांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली नाही. असे असताना नवख्यांनाच जिल्हा प्रमुख म्हणून संधी दिली गेली आहे. त्यामुळे शिवसैनिक हे नाराज आहेत. या दोघांव्यतिरीक्त अन्य पर्याय द्यावा अन्यथा वेगळा मार्ग स्विकारावा लागेल असा इशाराच त्यांनी दिला आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी शिंदे गटात जाण्याचे जणू संकेतच दिले आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.