नवनीत राणा यांनी वाटलेल्या साड्या मच्छरदाणी की मासे पकडायच्या जाळ्या, विरोधकांनी घेरलं

अमरावतीच्या खासदार पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. कुठल्या तरी कारणाने ते नेहमी चर्चेत असतात. आता त्यांनी वाटलेल्या साड्यांमुळे त्या वादात सापडल्या आहेत. त्यांनी वाटलेल्या साड्या या निकृष्ठ दर्जाच्या असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

नवनीत राणा यांनी वाटलेल्या साड्या मच्छरदाणी की मासे पकडायच्या जाळ्या, विरोधकांनी घेरलं
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 9:52 PM

नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांना वाटलेल्या या साड्या मच्छरदाणी आहेत की मासे पकडायच्या जाळ्या? हा प्रश्न खुद्द मेळघाटातल्याच महिला विचारत आहेत. एकीकडे महिलांना उत्तरं देताना नवनीत राणांची भंबेरी उडाली आहे. दुसरीकडे विरोधक नवनीत राणांना घेरत आहेत. 2 कोटीच्या गाडीत फिरणाऱ्यांनी साडे १७ रुपयाची साडी वाटून अपमान केल्याची टीका बच्चू कडूं यांनी केली आहे. राणा दांपत्य दर होळीला मेळघाटातल्या आदिवासींसोबत होळी साजरी करतात. त्याचे वेगवेगळे व्हिडीओ राणा दाम्पत्याकडून शेअरही केले जाते. यंदा नवनीत राणांनी तिथल्या महिलांना साड्यांचं वाटप केलं. पण साड्यांचा दर्जा पाहून आदिवासी महिलांनी निकृष्ट साड्यांचीच होळी केली.

अमरावतीचं राणा दाम्पत्य कायम कोणत्या ना कोणत्या वादानं चर्चेत राहतं. यंदाच्या निवडणुकीत साड्यांचा मुद्द्यावरुन विरोधकांनी राणांना लक्ष्य केलंय. अमरावती लोकसभेत बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट आणि अचलपूर या ६ विधानसभा येतात. 2019 ला राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीत राणा अपक्ष लढल्या, त्यांच्याविरोधात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ होते.

नवनीत राणा यांना 5 लाख 10 हजार 947, अडसूळांना 4 लाख 73 हजार 996 मतं पडली होती. नवनीत राणा 36 हजार 951 मतांनी जिंकल्या. त्यांच्या विजयात वंचित आघाडीनं घेतलेल्या 65 हजार 135 मतं महत्वाची ठरली. विजयानंतरच्या काहीच दिवसात नवनीत राणांनी राष्ट्रवादीशी जवळीक संपवून भाजप पुरस्कृत भूमिका घेतल्या.

यंदा नवनीत राणांनी थेट भाजपात प्रवेश करुन अमरावतीची उमेदवारी मिळवली आहे. गेल्यावेळी राणांना मिळालेलं ३६ हजारांचं मताधिक्क्य फार मोठं नसलं, तरी यंदा चार पक्षांचे उमेदवार असल्यानं अमरावतीचा निकालाबाबत उत्सुकता असणार आहे.

अमरावतीत भाजपकडून नवनीत राणा, काँग्रेसकडून बळवंत वानखेडे, बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेकडून दिनेश बूब आणि वंचितच्या पाठिंब्यावर आनंदराज आंबेडकरांनी अर्ज भरलाय.

नवनीत राणा ज्या अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत तेथे यंदा चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. प्रहारकडून राणा यांच्या विरोधात दिनेश बूब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकांच्या हितासाठी निवडणूक लढणार आणि जिंकणार असा निर्धार दिनेश बूब यांनी केला आहे. तर अमरावतीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं अशी विनंती नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांना केली होती.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.