… त्या दिवशी संघ नावाची पट्टी गळून पडेल, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य!

हिंदू नेमका कोण आहे, सांगताना मोहन भागवत म्हणाले, भारताची भक्ती करतो, देशाच्या वैविध्यावर विश्वास ठेवणाऱ्या संस्कृतीचं पालन करतो, तो खरा हिंदू आहे.

... त्या दिवशी संघ नावाची पट्टी गळून पडेल, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य!
Follow us
| Updated on: Dec 09, 2022 | 9:41 AM

नागपूर- स्वयंसेवकांचे प्रांत, स्वभाव वेगळे असताना शैली, कृती वेगळी असली तरी त्यांच्यात देशपूजा ही कृती समान असेल. भारताला सर्वश्रेष्ठ मानून त्यासारख बनण्यासाठी, भारताच्या वैभवासाठी, भारत समजून भारत सारख होण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. हे संघाच (Sangh) काम नाही तर सर्वांचे काम आहे. सर्वांनी करावे यासाठी संघ नाव घेऊन हे काम केले जात आहे. ज्यादिवशी सगळे देशावर प्रेम करायला लागतील त्या दिवशी संघ नावाची पट्टी निघून जाईल, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केलंय. नागपुरात संघ शिक्षा वर्ग तृतीय वर्षाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

संघ हे नाव महत्त्वाचं नाही-

संघाला नाव रोशन करायचे नाही तर समाज घडवायचा आहे. भारताला आत्त्मनिर्भर बनवायचे असेल तर नक्कल करून होणार नाही.. त्यासाठी भारत बनवावा लागेल. भारत समजावा लागेल, असं मोहन भागवत म्हणाले.

आजच्या युगात आपल्या देशासाठी प्रासंगिक आहे, ते धरून जगभरातील ज्ञान पाहिजे,… ते स्वीकारू भारतीय मूलतत्त्वाच्या आधारावर युगानुकूल भारताचं नवीन रूप घडवण्याचं काम स्वयंमसेवक करत आहे.. समाजला ते करावे लागेल. आपल्या आराध्याला सर्वश्रेष्ठ मानण्याचे काम करावं लागेल. अनेक जातीचा भाषेचा गौरव असणे हे काही पाप नाही, असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलंय.

संघासाठी सर्वात आधी भारताला प्राधान्य आहे. जो व्यक्ती भारतासाठी काम करतो, तो आमचा आहे. भारताच्या मार्गात जो आडवा येतो, तो आमचा नाही, असे मोहन भागवत म्हणाले.

हिंदू कोण आहे?

हिंदू नेमका कोण आहे, सांगताना मोहन भागवत म्हणाले, भारताची भक्ती करतो, देशाच्या वैविध्यावर विश्वास ठेवणाऱ्या संस्कृतीचं पालन करतो, तो खरा हिंदू आहे. अशा व्यक्तीने कोणतीही भाषा बोलली तरी चालते. कुणाचीही पूजा करो, कोणतेही कपडे घालो, कोणत्याही परंपरेचं पालन करो, कोणत्याही प्रांतात राहणारा किंवा कोणत्याही जातीचा असला तरी तो हिंदूच आहे, असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.

खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.