कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक, महाडिक बंधूंचा ‘या’ पॅनेलला पाठिंबा

पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना म्हणून कराडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. जयवंतराव भोसले सहकार पॅनल हे सत्ताधारी आहे.

कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक, महाडिक बंधूंचा 'या' पॅनेलला पाठिंबा
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 4:03 PM

कराड : कराडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या (Krishna Sugar Mill Election) निवडणुकीसाठी महाडिक गटाने जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला पाठिंबा जाहीर केला आहे. राहुल आणि सम्राट महाडिक यांची भूमिका स्पष्ट झाली आहे. पेठ नाका येथे कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत महाडिक बंधूंनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. जयवंतराव भोसले सहकार पॅनल हे सत्ताधारी आहेत. (Satara Karad Yashwantrao Mohite Krishna Sugar Mill Election Mahadik brothers backs Jayawantrao Bhosle Sahakar Panel)

विश्वजीत कदमांचा रयत पॅनेलला पाठिंबा

याआधी, काँग्रेस नेते आणि सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी इंद्रजीत मोहिते यांच्या रयत पॅनेलला पाठिंबा जाहीर केला होता. कृष्णा कारखान्याला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी रयत पॅनेलच्या पाठीशी असल्याचे कदम यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते.

मनोमीलनाच्या शक्यता संपल्या

सत्ताधाऱ्यांविरोधात आघाडी तयार करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी माजी चेअरमन अविनाश मोहिते आणि दुसरे माजी चेअरमन इंद्रजीत मोहिते यांना एकत्र आणण्यासाठी हालचाली केल्या होत्या. विश्वजीत कदमही या प्रकियेत होते. पण दोन्ही माजी चेअरमनना एकत्र आणण्यात यश आलं नव्हतं. त्यानंतर खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांनी या मनोमीलनाच्या चर्चेतून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं. सभासदच निर्णय घेतील असं चव्हाण म्हणाले होते.

कुणाविरोधात कोण लढतंय?

पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना म्हणून कराडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. जयवंतराव भोसले सहकार पॅनल हे सत्ताधारी आहे. विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले यांनी अर्जही दाखल केला आहे.

तिरंगी लढत कशी होणार?

डॉ. सुरेश भोसले आणि डॉ. अतुल भोसले यांनी सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनलकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता त्यांच्याविरोधात कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश भोसले यांच्या संस्थापक पॅनल आणि इंद्रजित मोहिते यांच्या रयत पॅनलचे आव्हान असेल.

कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक महत्त्वाची का?

कराडचा यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना हापश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा कारखाना म्हणून ओळखला जातो. त्याचं कार्यक्षेत्र सातारा, सांगली अशा दोन जिल्ह्यात आहे. 47 हजार 700 एवढी सभासद संख्या आहे. या महिन्याच्या शेवटी म्हणजेच 29 जूनला निवडणूक होते आहे. तर निकाल हा 1 जुलै रोजी लागेल.

कारखाना मोठा आणि सभासद संख्याही मोठी असल्यामुळे दोन्ही जिल्ह्यातल्या राजकारणावर ह्या निकालाचे परिणाम होणार हे निश्चित. राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाकडून यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक उच्च न्यायालयाच्या आदेशानं घेण्यात येत आहे. सातारा, सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यात कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे.

हे ही वाचा :

कृष्णा सहकारी कारखान्याच्या तिरंगी निवडणुकीत ट्विस्ट, विश्वजीत कदमांचा ‘या’ पॅनेलला पाठिंबा

कृष्णा साखर कारखाना निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी उमदेवारांची लगबग, सत्ताधारी पॅनेल विरोधात विरोधकांची एकजूट?

कराडच्या कृष्णा सहकारी कारखान्याची निवडणूक तिरंगी होणार, पृथ्वीराज चव्हाणांचा चर्चेतून काढता पाय

(Satara Karad Yashwantrao Mohite Krishna Sugar Mill Election Mahadik brothers backs Jayawantrao Bhosle Sahakar Panel)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.