आम्हाला मिळाले 50 खोके, पण तुमच्या पोटात का दुखतंय? शिंदे गटाच्या आमदाराचा प्रतिसवाल
सातऱ्यात ग्रामपंचायत निवडणूक निकालांत शिंदे गटाच्या विजयी सदस्यांचे अभिनंदन करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती.

साताराः आम्हाला मिळाले असतील 50 खोके. पण तुमच्या पोटात का दुखतंय, असा प्रतिसवाल शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना केला आहे. सातऱ्यात (Satara) ते बोलत होते. शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी करत बाहेर पडण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांना 50 खोके अर्थात पैशांची लाच मिळाल्याचा आरोप वारंवार केला जातो. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तर 50 खोके एकदम ओके… ही घोषणा महाराष्ट्राच्या गावा-गावात पोहोचवली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे नेते संधी मिळेल तेथे या आरोपांचं खंडन करतात.
सातऱ्यात ग्रामपंचायत निवडणूक निकालांत शिंदे गटाच्या विजयी सदस्यांचे अभिनंदन करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आमदार महेश शिंदे यांनी या टीकेला उत्तर दिलं. सातारा जिल्ह्यातील ताररोड येथे ही सभा झाली.
भाषण करताना महेश शिंदे यांनी शिंदे गटाच्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात महाविकास आघाडी सरकारवर आमदार महेश शिंदे यांनी टीका केली. आमदार शशिकांत शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली.
पन्नास खोके एकदम ओके या होत असलेल्या टीकेवर उत्तर देत विरोधकांना तुमच्या पोटात का दुखतय असा प्रतिसवाल केला..आमच्यावर पन्नास कोटी काय… हजार कोटी काय… या कोरेगाव मतदार संघाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निधी देतील असा टोला विरोधकांना लगावलाय. खोके म्हणलं की सर्वांच्या मनात पापच येणार. तुमच्या नेत्यांना लवासातून खोके मिळतात. कोरेगावच्या जरंडेश्वर कारखान्यातून खोके मिळतात. कृषी उत्पन्न बाजार समितीचे खोके विरोधकांना माहित आहेत, त्यामुळे खोक्याच्या घोषणा तर ते देणारच म्हणूनच जनतेने आम्हाला एवढा विजय दिला असल्याचा खोचक टोला आमदार महेश शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे.