शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदींची मराठीतून शपथ, काँग्रेस नेता म्हणतो आता शिवसैनिक शोभता!

प्रियांका चतुर्वेदी यांनी मराठीतून घेतलेल्या शपथविधीचे सत्यजीत तांबे यांनी कौतुक (Satyajeet Tambe Congratulation Priyanka Chaturvedi) केले.

शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदींची मराठीतून शपथ, काँग्रेस नेता म्हणतो आता शिवसैनिक शोभता!
Follow us
| Updated on: Jul 22, 2020 | 7:33 PM

नवी दिल्ली : राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी राज्यसभा सदनात आज (22 जुलै) खासदारकीची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते राजीव सातव, भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले, शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी आणि भाजपच्या भागवत कराड या महाराष्ट्रातील सहा खासदारांनी शपथ घेतली. या शपथविधी दरम्यान प्रियांका चतुर्वेदी यांनी मराठीतून शपथ घेतली. चतुर्वेदी यांनी मराठीतून घेतलेल्या शपथविधीचे उत्तर महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी कौतुक केले. (Satyajeet Tambe Congratulation Priyanka Chaturvedi after took Rajya Sabha Oath in Marathi)

“प्रियांका चतुर्वेदी यांनी मराठीतून शपथ घेतल्याबद्दल तुमचे विशेष अभिनंदन, आता तुम्ही खरे शिवसैनिक शोभता,” असे ट्विट उत्तर महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

महाराष्ट्रातून सात जणांची मार्च महिन्यात खासदारपदी नियुक्ती झाली. त्यापैकी सहा जणांनी शपथ घेतली. प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभा सदनात मराठीतून शपथ घेतली.

“मी प्रियांका विक्रम चतुर्वेदी राज्यसभेची सदस्य म्हणून निवडून आली असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे, अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन.” अशी शपथ प्रियांका चतुर्वेदी यांनी घेतली.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

महाराष्ट्रातून सात जणांची मार्च महिन्यात खासदारपदी नियुक्ती झाली. त्यापैकी सहा जणांनी शपथ घेतली. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या उपस्थित नव्हत्या. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांच्या नावाचा पुकारा केला, मात्र त्या गैरहजर असल्याचे समजल्यानंतर शरद पवार यांना शपथ घेण्यासाठी बोलवण्यात (Satyajeet Tambe Congratulation Priyanka Chaturvedi after took Rajya Sabha Oath in Marathi) आले.

महाराष्ट्रातील सात खासदार

  1. उदयनराजे भोसले – भाजप
  2. भागवत कराड – भाजप
  3. रामदास आठवले – भाजप पुरस्कृत
  4. शरद पवार – राष्ट्रवादी
  5. फौजिया खान – राष्ट्रवादी
  6. राजीव सातव – काँग्रेस
  7. प्रियांका चतुर्वेदी – शिवसेना

संबंधित बातम्या : 

Rajyasabha MP Oath Ceremony | राज्यसभा खासदारांचा शपथविधी, उदयनराजेंची इंग्रजीत, पवारांची हिंदीत, चतुर्वेदींची मराठीत शपथ

Udayanraje Rajyasabha MP Oath | इंग्रजीतून शपथ घेऊन उदयनराजे म्हणाले, जय भवानी, जय शिवाजी, सभापतींकडून समज

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.