मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द, ठाकरे सरकारवर संकट?; वाचा सविस्तर

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं असून गायकवाड समितीच्या शिफारशीही फेटाळल्या आहेत. (SC quashes Maharashtra law granting reservation to Maratha community)

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द, ठाकरे सरकारवर संकट?; वाचा सविस्तर
cm uddhav thackeray
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 12:13 PM

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं असून गायकवाड समितीच्या शिफारशीही फेटाळल्या आहेत. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती दिसून येत नाही. त्यामुळे एसीबीसीच्या नावाखाली देण्यात आलेलं आरक्षण आम्ही रद्द करत आहोत, असं निरीक्षणही कोर्टाने नोंदवलं आहे. या निर्णयामुळे मराठा समाजावर दूरगामी परिणाम होणार आहेच. शिवाय ठाकरे सरकारवरही राजकीय संकट ओढवण्याची शक्यता आहे. (SC quashes Maharashtra law granting reservation to Maratha community)

कोर्टाने काय म्हटलं?

आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायामूर्ती स्टीस अशोक भूषण, एल. नागेश्वरा राव, एस. अब्दूल नाझीर, हेमंत गुप्ता आणि एस. रवींद्र भट या पाच न्यायामूर्तींच्या घटनापीठाकडे या प्रकरणाची सुनावणी झाली. 26 मार्च रोजी कोर्टाने यावरील सुनावणी राखून ठेवली होती. आत त्यावर निर्णय देण्यात आला आहे. मराठा आरक्षणाचं प्रकरण इंद्रा सहाणीच्या निर्णयाला आव्हान देत मोठ्या बेंच कडे सोपवण्याची गरज नाही. मराठा आरक्षण देण्यासंदर्भात स्थिती राज्यात निर्माण झालेली नाही, असं निरीक्षण नोंदवत सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द झालंय, असं मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितलं आहे. कोर्टाने गायकवाड समितीचा अहवालही फेटाळून लावला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

घटनापीठाने मराठा आरक्षणावर अत्यंत महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहे. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा अधिक वाढवता येणार नाही. आणीबाणीची स्थिती सांगून आरक्षणाची मर्यादा वाढवली होती. हे नियमांचं उल्लंघन होतं. परंतु परिस्थिती तशी नव्हती, असं घटनापीठाने म्हटलं आहे. 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण का द्यावं? याबाबत गायकवाड समितीनेही काहीच स्पष्ट केलं नव्हतं. गायकवाड समितीच्या अहवालात त्याबाबतचा निष्कर्ष काढण्यात आलेला नव्हता, असं जस्टीस अशोक भूषण यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाला आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास ठरवण्यात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने समानतेच्या तत्त्वाचं उल्लंघन केलं आहे. मात्र, या निर्णयामुळे वैद्यकीय प्रवेशातील आरक्षणावर काहीही परिणाम होणार नाही, असंही कोर्टाने नमूद केलं आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिलं होतं. त्यामुळे राज्यातील आरक्षणाची मर्यादा 68 टक्क्यांवर गेली होती. या आरक्षणाला कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं.

मराठा आरक्षण कधी लागू झाले होते?

तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 16 टक्के आरक्षण देण्याची तरतूद मराठा आरक्षण विधेयकात केली होती. यामध्ये ओबीसी समाजाला कुठलाही धक्का न लावता एसईबीसी या विशेष प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. 1 डिसेंबर 2018 पासून राज्यात मराठा आरक्षण विधेयक लागू झालं होतं.

शैक्षणिक आरक्षण

राज्य सरकारने मराठा समाजाला शैक्षणिक प्रवेश आणि नोकरीत मराठा समाजाला आरक्षण जाहीर केलं. मात्र नोकरीतील आरक्षणाला हायकोर्टाने यापूर्वी स्थगिती दिली होती. त्यानंतर आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांनी शैक्षणिक आरक्षणालाही स्थगितीची मागणी केली होती. मात्र हायकोर्टाने मराठा समाजाचं शैक्षणिक आरक्षण अबाधित ठेवलं होतं.

ठाकरे सरकार समोर पर्याय काय?

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं असलं तरी राज्यातील ठाकरे सरकारसमोर दोन पर्याय आहेत. सरकार दहा दिवसात पुन्हा पुनर्विचार याचिका दाखल करावी लागणार आहे. कायद्याची त्रुटी किंवा एखाद्या मुद्द्याची दखल घेण्यात आली नाही, हे दाखवून देण्यात सरकार यशस्वी ठरलं तरच कोर्ट ही याचिका पुन्हा सुनावणीसाठी घेऊ शकतात. नाही तर सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळली जाऊ शकते. दुसरा पर्याय म्हणजे सुपर न्युमररी आरक्षण देणं हे होय. सुपर न्युमररी आरक्षण दिल्यास सरकार मराठा समाजाचा रोष शांत करू शकते, असं राजकीय निरीक्षक सांगतात.

राजकीय संकट ओढवणार, पण कधी?

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने ठाकरे सरकारसमोरील संकट वाढलं आहे. आरक्षण रद्द झाल्याने सरकारला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या कोरोनाचं संकट असल्याने मराठा समाजाकडून निदर्शने, लाखालाखाचे मोर्चे निघण्याची शक्यता कमी आहे. कोरोनामुळे आंदोलनाला खिळ बसणार असल्याने सरकारला दिलासा मिळाला असला तरी मराठा समाजाचा हा रोष राज्यातील प्रत्येक निवडणुकीतून दिसून येण्याची शक्यता आहे. राज्यातील पंचायत समितीपासून ते विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे सरकारविरोधात मराठा समाज आपला रोष व्यक्त करू शकतो, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्याने राजकीय संकट ओढवू नये म्हणून ठाकरे सरकारला तातडीने उपयायोजना कराव्या लागणार आहेत. नाही तर पुढील विधानसभा निवडणुकीत ठाकरे सरकारला त्याची मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्याताही वर्तवली जात आहे.

चव्हाणांचं काय होणार?

मराठा समाजाचं आरक्षण टिकवण्यात आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना अपयश आलं आहे. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि शिवसंग्रामचे नेते चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मराठा समाजात चव्हाण यांच्या विरोधात अधिकच रोष होता, आता त्यात आणखी भर पडली आहे. त्यामुळे चव्हाणांचं राजकीय भवितव्यावर टांगती तलवार असल्याचं राजकीय निरीक्षकांनी सांगितलं.

काय आहे इंदिरा सहानी जजमेंट?

1920 पासून तामिळनाडूमध्ये आरक्षण आहे. 1951 मध्ये राज्यघटनेत दुरूस्ती करून आरक्षणाची तरतूद केली गेली. ज्या मंडल आयोगाच्या शिफारशीनंतर ओबीसींना 27 टक्के आरक्षण लागू केलं गेलं होतं, त्याच्या आधीपासून म्हणजेच 1990 च्या आधीपासून तामिळनाडूत 60 टक्के आरक्षण होतं. सुप्रीम कोर्टाने 1992 सालच्या इंदिरा साहनी प्रकरणात आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवर आणली होती. 1993 साली जयललिता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री असताना त्यांनी 69 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय घेण्यासाठी त्यांनी केंद्र सरकारवर दबाव टाकून घटनेच्या नवव्या परिशिष्टामध्ये त्याची तरतूद करायला भाग पाडलं होतं. 69 टक्के आरक्षणाच्या या निर्णयाला घटनेचं संरक्षण मिळाल्यामुळे त्याची अंमलबजावणी करणं सोपं गेलं होतं. (SC quashes Maharashtra law granting reservation to Maratha community)

महाराष्ट्रात 74% आरक्षण

अनुसूचित जाती -13% अनुसूचित जमाती – 7% इतर मागासवर्गीय – 19% विशेष मागासवर्गीय – 2% विमुक्त जाती- 3% NT – 2.5% NT धनगर – 3.5% VJNT – 2% मराठा – 12% आर्थिकदृष्ट्या मागास – 10%  (SC quashes Maharashtra law granting reservation to Maratha community)

संबंधित बातम्या:

Maratha Reservation: महाराष्ट्र सरकारला मोठा झटका, मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द, कोर्टात कोण काय म्हणालं? ते वाचा सविस्तर

Maratha Reservation Live | मराठा समाजासाठी हा दिवस दुर्दैवी दिवस : खासदार संभाजीराजे

LIVE | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या मुलांच्या जवळपास 6 कंपन्या सीबीआयच्या रडारवर

(SC quashes Maharashtra law granting reservation to Maratha community)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.