जळगाव: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आजही त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होऊ शकला नाही. त्यातच खडसे यांनी मीडियाने माझ्या प्रवेशाचे मुहूर्त काढले होते. त्यामुळे ते चुकले, असं सांगतानाच योग्य वेळ येईल. वाट पाहा, असं विधान केलं आहे. पक्षांतराबाबत खडसे यांनी पहिल्यांदाच थेट आणि सूचक विधान केल्याने खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. (BJP leader Eknath Khadse’s clarify on joining ncp)
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आज एकनाथ खडसे हे भाजपमधून सीमोल्लंघन करत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. एवढेच नव्हे तर खडसे यांना कृषीमंत्रीपद दिलं जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यांच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास सांगितल्याने खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेतही मिळत होते. मात्र, खडसे यांनी आज जळगावातच ठाण मांडल्याने ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यातच त्यांनी आज मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार हा मुहूर्त तुम्हीच काढला होता. मी काढला नव्हता. त्यामुळे तो चुकला, असं खडसे म्हणाले. त्यावर योग्य मुहूर्त कोणता? असा सवाल त्यांना केला असता, योग्य वेळ येईल. वाट पाहा, असं सूचक विधान खडसे यांनी केलं.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख आज जळगावात आले आहेत. ते एकनाथ खडसे यांच्यासोबत रावेर हत्याकांडातील कुटुंबीयांची विचारपूस करणार आहे. त्याआधी हे दोन्ही नेते शासकीय विश्रामगृहात भेटले. यावेळी दोघांमध्ये चर्चाही झाली. मात्र, या दोघात काय चर्चा झाली. याचा तपशील दोघांनीही सांगितला नाही. देशमुख यांनी खडसे यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना बळ मिळाले आहे. (BJP leader Eknath Khadse’s clarify on joining ncp)
संबंधित बातम्या:
एखादा नेता पक्षात आल्यावर फायदा होता, तसा गेल्यावर तोटा होतो, पंकजा मुंडेंचं खडसेंवर भाष्य
एकनाथ खडसेंचा संभाव्य राष्ट्रवादी प्रवेश, सुप्रिया सुळेंनी चेंडू ‘या’ नेत्याकडे टोलवला
‘नाथाभाऊ…लवकर राष्ट्रवादीत या’, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची एकनाथ खडसेंना विनंती
(BJP leader Eknath Khadse’s clarify on joining ncp)