ठाकरे गटाला जोर का झटका… इकडे उद्धव ठाकरेंचं भाषण संपलं, तिकडे बड्या महिला नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

राज्यात विकासांची कामे सुरू झाली आहेत, सर्वसामान्यांच्या हिताचे कामे आम्ही करतोय. त्यामुळेच हजारो कार्यकर्ते आमच्यासोबत येत आहेत. 50 आमदारही आमच्यासोबत याच कारणाने आले, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते मीडियाशी संवाद साधत होते.

ठाकरे गटाला जोर का झटका... इकडे उद्धव ठाकरेंचं भाषण संपलं, तिकडे बड्या महिला नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी
anita birjeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 11, 2024 | 9:53 AM

भगवा सप्ताह निमित्ताने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल ठाण्यात आले होते. ठाण्यातील सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपची चांगलीच पिसे काढली. उद्धव ठाकरे यांचा हा घणाघाती सुरू असतानाच ठाकरे गटाला मात्र जोर का झटका लागला. उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि कट्टर शिवसैनिक अनिता बिर्जे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली. अनिता बिर्जे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा झटका असल्याचं म्हटलं जातं आहे.

अनिता बिर्जे यांनी ठाण्यातील आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिवसेनेच्या जडणघडणीच्या कालखंडात अनिताताई बिर्जे यांनी तत्कालीन शिवसैनिकांच्या साथीने शिवसेनेची महिला आघाडी तळागाळात पोहचवली होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमातही अनिता बिर्जे यांनी पक्षासाठी केलेले कार्य ठळकपणे दाखवण्यात आले होते. एकनाथ शिंदे यांनी पक्षात उठाव करून पुन्हा सत्तास्थापना केली तेव्हा अनिता बिर्जे यांनी या निर्णयाला ठाम विरोध करून उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले होते.

म्हणून पक्ष सोडला

उबाठा गटात कायम राहिल्यामुळे अनिता बिर्जे यांची उबाठा सेनेत उपनेतेपदी वर्णी लावण्यात आली होती. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने उबाठा गटाची ठाण्यात वाताहत झाली. ती पाहता ठाण्यातील उबाठा गटाचे अनेक पदाधिकारी नाराज आहेत. एकनाथ शिंदे हेच दिघे साहेबांना अभिप्रेत असलेला जनसेवेचा वारसा पुढे चालवत आहेत हे पटल्यामुळेच आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे अनिता बिर्जे यांनी यावेळी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी काम करत असून ते पटल्यामुळेच आपण त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वाघीण पुन्हा सक्रिय

अनिता बिर्जे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेला नवीन बळ मिळाले आहे. शिवसेनेची वाघीण पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होत असल्याचा आनंद आहे, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. बिर्जेबाईंच्या आजवरच्या अनुभवाचा फायदा आगामी काळात पक्षाला नक्की होईल. ठाणे जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडी अधिक मजबूत होऊन जोमाने काम करेल अशी अपेक्षा यावेळी शिंदे यांनी व्यक्त केली.

यावेळी ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका सुवर्णा करंजे, माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक रमाकांत मढवी, टेम्भी नाका शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे आणि ठाणे शिवसेनेतील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Non Stop LIVE Update
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्.
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?.
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.