Sharad Pawar : शरद पवारांना कानाखाली मारणारा 8 वर्ष फरार होता, हे तुम्हाला माहितीये का?

Ketaki Chitale and Sharad Pawar : अटक करण्यात आलेल्या या तरुणाचं नाव अरविंदर सिंह होतं. पण अरविंदर हा कोठडीतून पसार झाला होता.

Sharad Pawar : शरद पवारांना कानाखाली मारणारा 8 वर्ष फरार होता, हे तुम्हाला माहितीये का?
शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 6:39 AM

मुंबई : मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale Facebook Post) हीच्या फेसबुक पोस्टनं गदारोळ माजलाय. राजकीय प्रतिक्रिया जोर धरतायत. तिच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले. शरद पवारांबाबत (Sharad Pawar) आक्षेपार्ह आणि वादग्रस्त भाषा वापरल्याप्रकरणी तिच्यावर कारवाईही झाली. या सगळ्याच्या निमित्तानं शरद पवारांवर जेव्हा जेव्हा निशाणा साधण्यात आला, तेव्हा तेव्हा महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं, हे पुन्हा पाहायला मिळालं. केतकी चितळे हीच्या फेसबुक पोस्टआधी शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी दिलेली धडक देखील त्यामुळेच चर्चेत आली. अचानक दुपारच्या वेळेला सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन काहींनी चप्पल भिरकावल्या, घोषणाबाजी केली. यानंतर एकच गोंधळ उडालेला. त्यानंतर आता पुन्हा केतकी चितळे हीची फेसबुक पोस्ट शरद पवारांवर निशाणा साधणारी ठरलीय. मात्र या पोस्टआधी भारतीय जनता पक्षाकडूनही शरद पवारांवर टीका करण्यात आली होती. पवारांनी साताऱ्यात केलेल्या भाषणावरुन टीका करण्यात आली. या भाषणात शरद पवार यांनी एका कवितेचा संदर्भ देत हिंदू देवी देवतांवर वक्तव्य केली. या सगळ्यात एक गोष्ट जी चर्चेत आली, ती शरद पवार यांच्यावर झालेल्या पहिल्या हल्ल्याची (Attack of Sharad Pawar)! शरद पवार यांना एका पंजाबी तरुणानं कानशिलात लगावली होती. या घटनेनंतरही मोठा वादंग झाला होता. याच घटनेची इनसाईड स्टोरी आणि पवारांवर झालेले हल्ले जाणून घेणार आहोत..

पहिला हल्ला

ते वर्ष होतं 2011. शरद पवार दिल्लीत होते. कृषीमंत्री असताना एका दिल्लीत इफ्फोच्या कार्यक्रमानंतर नंतर ते निघाले होते. निघाल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी एका पंजाबी तरुणानं शरद पवारांच्या कानशिलात लगावली होती. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर शरद पवार बिथरले होते. त्यांचा तोल जाऊन ते भिंतीवर कोसळल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं होतं.

अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर गोंधळ उडाला. पण सुरक्षारक्षकांना तातडीनं शरद पवारांवर हल्ला करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्याला अटकही करण्यात आलेली.

हे सुद्धा वाचा

अटक करण्यात आलेल्या या तरुणाचं नाव अरविंदर सिंह होतं. पण अरविंदर हा कोठडीतून पसार झाला होता. तो कुठे गेलाय, कुठे लपलाय, याचा शोध पोलिसांकडून सुरु होता. पण पोलिसांना तो कुठेच सापडला नाही. अखेर 2014 मध्ये दिल्ली कोर्टानं अरविंदला फरार घोषित केलं.

फरार घोषित केलेल्या अरविंदर पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. तब्बल 8 वर्ष या अरविंदर सिंहचा शोध पोलीस घेत होते. आठ वर्षांनंतर अखेर हा अरविंदर पोलिसांना सापजला. आणि त्याला अटक करुन पुन्हा त्याची रवानगी कोर्टात करण्यात आली होती. 2019 साली पोलिसांनी पवारांवर हल्ला करणाऱ्या अरविंदरच्या मुसक्या पुन्हा आवळल्या होत्या.

का केला होता अरविंदरने हल्ला?

शरद पवारांच्या कानशिलात लगावण्याची ही घटना घडून आता 11 वर्षा उलटली आहेत. शरद पवार तेव्हा कृषीमंत्री होते. आता ते खासदार आहेत. 11 वर्षांपूर्वी जेव्हा अरविंदरला अटक करण्यात आली होती, तेव्हा त्याची प्रतिक्रिया माध्यमांनी जाणून घेण्यासाठी प्रयत्न केले होते. तेव्हा भ्रष्ट असल्याचा आरोप करत शरद पवारांना मारहाण केली असल्याचं त्यांनं म्हटलं होतं.

सदावर्तेंवर कारवाई…

दरम्यान, शरद पवार यांच्या सिल्वर ओक घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्तेंनाही ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. मग राज्यभर वेगवेगळ्या प्रकरणी सदावर्तेंवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पोलीस कोठडी आणि न्यायलयीन प्रक्रियेलाही सामोरं जावं लागलं होतं.

नाशिकमधून तरुण ताब्यात आणि आता केतकी

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याबाबत ट्वीटवर गरळ ओकणाऱ्या तरुणाविरोधातही पोलिसांनी कारवाई केली. नाशिकच्या नदिंडोरीमधून या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. शरद पवार यांच्याबाबत विकृत मानसिकतेतून वादग्रस्त ट्वीट केल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.

दरम्यान, फेसबुकवर आक्षेपार्ह टीप्पणी केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हीच्या अडचणीही वाढल्या आहेत. सुरुवातीला कळव्यात, त्यानंतर ठाण्यात आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी तिच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. मग पोलिसांच्या कारवाईला देखील केतकीला सामोरं जावं लागलंय.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...