प्रकाश आबिटकरांचे चंद्रकांत पाटलांना धक्क्यावर धक्के, आधी ग्राम पंचायत जिंकली, आता एकमेव सदस्य फोडला

भुदरगड तालुका पंचायतीमधील (Bhudargad Panchayat Samiti) भाजपच्या एकमेव सदस्या आक्काताई नलावडे (Akkatai Nalawade) यांनी शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला.

प्रकाश आबिटकरांचे चंद्रकांत पाटलांना धक्क्यावर धक्के, आधी ग्राम पंचायत जिंकली, आता एकमेव सदस्य फोडला
Chandrakant Patil_Prakash Abitkar
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 1:25 PM

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांना आणखी एक धक्का बसला. भुदरगड तालुका पंचायतीमधील (Bhudargad Panchayat Samiti) भाजपच्या एकमेव सदस्या आक्काताई नलावडे (Akkatai Nalawade) यांनी शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला. आक्काताई नलावडे या आकुर्डे पंचायत समिती मतदारसंघाचं नेतृत्त्व करतात. शिवसेना खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत आक्काताई नलावडे यांनी शिवबंधन बांधलं. चंद्रकांतदादांचं गाव असलेल्या पंचायत समितीमधील सदस्यच शिवसेनेच्या गळाला लागल्याने चर्चेला उधाण आलं आहे. (Setback to BJP Chandrakant Patil in Bhudargad Panchayat Samiti Akkatai Nalawade joins shiv sena)

यावेळी खासदार संजयदादा मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, गोकुळचे नूतन संचालक नंदकुमार डेंगे, राहुरी कृषी यांच्यासह पंचायत समिती सदस्य आणि प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते.

आक्काताई नलावडे या भाजपच्या सदस्या होत्या. मात्र त्यांनी कमळ सोडून धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतला. चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्याच गावात, त्यांचा एकमेवस सदस्य पक्षात न राहिल्याने, राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

सध्या भुदगर पंचायत समितीवर शिवसेनेचं वर्चस्व आहे. शिवसेना आमदार प्रकाश आबिटकरांच्या नेतृत्त्वात पंचायत समितीचं कामकाज सुरु आहे. आता भाजपचा एकमेव सदस्यही शिवसेनेने फोडल्याने, शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे.

भुदरगड पंचायत समितीचे एकूण 8 सदस्य आहेत

2016-17 मध्ये झालेल्या निवडणुकीत  शिवसेनेला 5,राष्ट्रवादीला 2 आणि भाजपला 1 जागा मिळाली होती. आता भाजपचा सदस्य शिवसेनेच्या गळाला लागल्यानंतर शिवसेनेचे संख्याबळ 6 झालं आहे. पंचयत समिती सभापती म्हणून सुनीलराव निंबाळकर कार्यरत आहेत.

खानापूर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांचं गाव असलेल्या खानापूर ग्रामपंचयतीवरही शिवसेनेने झेंडा फडकवला होता. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या गावातच काँग्रेस-राष्ट्रवादीशी भाजपने हातमिळवणी केली होती. शिवसेनेला शह देण्यासाठी तिन्ही पक्षाचे स्थानिक नेते एकत्र आले. शिवसेनेला शह देण्यासाठी तिन्ही पक्षाचे स्थानिक नेते एकत्र आले होते. कोल्हापुरातील खानापूर ग्रामपंचायतीसाठी झालेल्या या अनोख्या आघाडीची राज्यभर चर्चा सुरु झाली होती. मात्र शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी खानापूरमध्ये विजय खेचून आणला होता.

कोण आहेत प्रकाश आबिटकर? 

  • प्रकाश आबिटकर हे शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत
  • भुदरगड मतदारसंघाचे ते नेतृत्त्व करतात.
  • प्रकाश आबिटकर दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत

संबंधित बातम्या

Kolhapur Gram Panchayat Election Results 2021: प्रकाश आबिटकरांनी करुन दाखवलं, खानापुरात चंद्रकांत पाटलांना हरवलं, सेनेचा झेंडा    

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे; चंद्रकांतदादांची पहिली प्रतिक्रिया 

(Setback to BJP Chandrakant Patil in Bhudargad Panchayat Samiti Akkatai Nalawade joins shiv sena)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.