बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादावर शहाजी बापू पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादावर शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय....
सांगोला : बच्चू कडू आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद आता चांगलाच पेटलाय. यावर सांगोल्याचे, शिंदेगटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू यांची नाराजी ही रवी राणा यांच्यावर, त्यांच्या विधानावर आहे. त्यामुळे ही नाराजी शिंदे सरकारवर आहे, असं म्हणता येणार नाही. रवी राणा आणि बच्चू कडू (Bacchu kadu) यांच्यातील वाद लवकरच मिटेल, अशी आशा आहे, असं शहाजीबापू पाटील (ShahajiBapu Patil) म्हणालेत.
बच्चू कडू रवी राणा हे दोन्ही आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द पाळतील, असं शहाजीबापू म्हणालेत.
बच्चू कडू यांनी खोके घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला. त्यावरून बच्चू कडू चिडले. लवकरात लवकर पुरावे द्यावेत. अन्यथा रवी राणा यांनी आपले शब्द मागे घ्यावेत, असं बच्चू कडू म्हणाले. हे प्रकरण सध्या चांगलंच तापलंय. आज दुपारी तीन वाजता रवी राणा मुख्यमंत्री शिंदे यांना भेटणार आहेत. तर संध्याकाळी आठ वाजता बच्चू कडू शिंदेंना भेटण्यासाठी मुंबईला रवाना होणार आहेत.
सांगोला तालुक्यात यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा दौरा केला आहे. सांगोला तालुक्यात उद्धव ठाकरे आले. म्हणून काही फरक पडणार नाही, असंही शहाजीबापू म्हणालेत.
गेली चाळीस वर्षे गणपतराव देशमुख आणि शहाजी पाटील यांचे सांगोला तालुक्यातील घराघरात आपुलकीचे आणि प्रेमाचे नाते आहे. उद्धव ठाकरे सांगोला तालुक्यात आल्याने काही फायदा होणार नाही सांगोला तालुका शेतकरी कामगारांचा पक्षाचा आहे, असं शहाजी बापू पाटील म्हणालेत.