त्या उद्धव ठाकरेंना म्हणावं दोन मिनिटं इथे येऊन जा मग कळेल; शहाजीबापू यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख
आज एक घाव दोन तुकडे म्हणता. अडीच वर्षापूर्वी तुम्ही युतीचे तुकडे केले. आता कशाचे करता? तुम्ही आमदारांना फरफटत नेलं. आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उकिरड्यावर फेकून दिलं. ते पाप उद्धव ठाकरे तुम्ही केलं.
मुंबई: गुलाबराव, तुमच्याकडे फोन आहे का? तुमच्या पाया पडतो. त्या उद्धव ठाकरेंना फोन करा आणि दोन मिनिटं इथे येऊन जा म्हणावं. खरी कोणीत शिवसेना (shivsena) आहे तुला कळेल. हे भगवं वादळ उद्धव ठाकरे (uddhav thackeray) तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राची खरी शिवसेना कोणती आहे याचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार नाही, अशा शब्दात शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (shahaji bapu patil) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दसरा मेळावा बीकेसीमध्ये सुरू आहे. यावेळी शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. व्यासपीठावरील सर्व आमदार आणि खासदारांनी प्रत्येकाने जनतेला सांगितलं होतं की, निवडणूक झाल्यावर भाजप-शिवसेनेचं सरकार बनवू. निवडणूक झाली. मतमोजणी झाली. दोन्ही पक्षाचे आमदार निवडून आले. आम्ही आनंदात मुंबईत आलो आणि इथे आल्यावर बिघडा बिघडी सुरू झाली, असं शहाजीबापू पाटील म्हणाले.
आज गद्दारी केली. तेव्हा महाराष्ट्राने शाबासकी दिली असं म्हणायचं का? फडणवीसांच्या पाठित खंजीर खुपसला ते महाराष्ट्र अजून विसरला नाही. खंजीर खुपसून तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेला. मी काँग्रेसमध्ये होतो. बाळासाहेबांची सभा ऐकायचो. बाळासाहेब ठाकरे मैदाचं पोतं कुणाला म्हणाले? बारामतीचा मंमद्या कुणाला म्हटलं? दाऊदचा हस्तक कुणाला म्हटलं? विलायती सोनिया गांधी मला चालणार नाही असं कुणाला म्हणाले? शिवसेना प्रमुखांनी हे उद्गार कुणासाठी काढले होते?; असा सवाल त्यांनी केला.
आज एक घाव दोन तुकडे म्हणता. अडीच वर्षापूर्वी तुम्ही युतीचे तुकडे केले. आता कशाचे करता? तुम्ही आमदारांना फरफटत नेलं. आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उकिरड्यावर फेकून दिलं. ते पाप उद्धव ठाकरे तुम्ही केलं. एकनाथ शिंदेंनी ते पाप धुतलं. ही गद्दारी नाही. त्यांनी झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी उचलेलं पाऊल आहे. आमच्या नेत्यांचे अनेक मेळावे झाले. लाखाने लोक मेळाव्याला येत आहेत. हे कशाचं द्योतक आहे? असा सवालही त्यांनी केला.