Shahajibapu Patil Video : उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीला गुवाहाटी फेम शाहजीबापू पाटलांचं उत्तरं, म्हणाले 9 पत्रं देऊनही…
आता शिंदे गटाकडून हे उद्धव ठाकरे यांच्या वादळी मुलाखतीवर जोरदार प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यातच आता गुवाहाटी फेम फेमस झालेल्या शहाजी बापू पाटलांची (Shahaji Bapu Patil) प्रतिक्रिया यावर आलेली आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या बंडाने ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) पडल्यानंतर तब्बल 26 दिवसांनी उद्धव ठाकरे यांची एक वादळी मुलाखत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतली. त्या मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा बंडखोर गटावर टीकेचे बाण सोडले. त्यात उद्धव ठाकरे यांनी आजारपणाचे कारण तर दिलंच, तसेच कोरोना काळात बाहेर न पडण्यापासून ते गद्दारांचा माथ्यावरती लागलेला शिक्का पुसणार नाही, इथपर्यंत सर्व मुद्द्यावरती त्यांनी वक्तव्य केलं. तसेच शिवसेना कुणाची? याबाबत ही स्पष्टीकरण दिलं. मात्र आता शिंदे गटाकडून हे उद्धव ठाकरे यांच्या वादळी मुलाखतीवर जोरदार प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यातच आता गुवाहाटी फेम फेमस झालेल्या शहाजी बापू पाटलांची (Shahaji Bapu Patil) प्रतिक्रिया यावर आलेली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीला जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. तसेच त्यांची अडचण काय? हे पुन्हा एकदा थेट बोलून दाखवलं आहे.
ऐका बापू काय म्हणाले?
मरायला लागल्यावर टाकलेलं पाऊल
याबाबत बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा विषय नाही. हा तुमचा दावा आहे, मात्र सगळी काम शिंदे साहेबांकडून करून घ्या असं तर सांगायचं होतं. त्यामुळे सर्व कामे मार्गी लागली असती. कामं अडकून राहिली नसती. तसेच आमच्या एकाही पत्रावर सही झाली नाही. असेही त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं आहे. आमची काम होत नसतील तर लोक आम्हाला मत कशी देणार? असा सवालही त्यांनी केला आहे. तर गेली अडीच वर्षे हे सगळं सोसलं मात्र मरायला लागल्यावर टाकलेले हे पाऊल होतं, असे या बंडाचं वर्णन शहाजी बापू पाटील यांनी केलं आहे.
9 पत्रं देऊनही आदित्य ठाकरेंनी काम केलं नाही
आमची काम होत नसताना, आमचं अस्तित्व नष्ट होत असताना जर असं पाऊल टाकलं तर त्यात चुकलं काय? असा सवालही शहाजी बापू पाटलांनी केला आहे. तसेच त्यांनी आदित्य ठाकरे यांना नऊ पत्रं पाठवल्याचा दावा केला आहे. नऊ पत्रं देऊनही आदित्य ठाकरेंनी माझं काम केलं नाही, असा थेट आरोप पाटलांनी केला आहे. तसेच मला एक रुपया दिला नाही, आठ तळी माझ्या तालुक्यात आहेत, मात्र तरीही त्यासाठी पैसा मिळाला नाही, असे त्यांनी बोलून दाखवले आहे. तसेच चुकीचं काही झालं असेल तर ते आगामी काळात ते स्पष्ट होईल, असं थेट आव्हान शहाजी बापू पाटलांनी दिलं आहे.