धनुष्यबाण चिन्हं नाही मिळालं तर…?; शंभुराज देसाई यांनी सांगितला पुढचा प्लान

चिन्हं आम्हालाच मिळेल. बहुमतातील शिवसेना आमच्याकडे आहे. आमदार, खासदार, नगरसेवक. जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंचाचं बहुमत आमच्याकडे आहे. लोकांमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचं बहुमत आमच्याकडे आहे.

धनुष्यबाण चिन्हं नाही मिळालं तर...?; शंभुराज देसाई यांनी सांगितला पुढचा प्लान
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 1:42 PM

मुंबई: धनुष्यबाण चिन्हं गोठवण्याची मागणी शिंदे गटाच्या वकिलाने आज सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme court) घटनापीठासमोर केली आहे. त्यामुळे शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्हं मिळणार की शिवसेनेला (shivsena) धनुष्यबाण चिन्हं मिळणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. येत्या 27 सप्टेंबर रोजी होणाऱ्या घटनापीठासमोरील (Constitution Bench) सुनावणीवेळी धनुष्यबाण कुणाचं हे स्पष्ट होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांनी मोठं विधान केलं आहे. धनुष्यबाण आम्हाला मिळणारच, असा दावा शंभुराज देसाई यांनी केला आहे. तसेच आम्हाला धनुष्यबाण नाही मिळालं तर आम्ही पुढची पूर्ण तयारी केली असल्यचांही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्यासाठी शिंदे गट पूर्ण ताकदीने सज्ज झाल्याचं स्पष्ट दिसत आहे.

टीव्ही9 मराठीच्या कार्यालयातील विघ्नहर्त्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी शंभुराज देसाई आले होते. यावेळी त्यांनी हा दावा केला आहे. यावेळी त्यांनी धनुष्यबाण नाही मिळालं तर काय प्लॅन केला त्याची माहितीही दिली. चिन्हं आम्हालाच मिळेल. बहुमतातील शिवसेना आमच्याकडे आहे. आमदार, खासदार, नगरसेवक. जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंचाचं बहुमत आमच्याकडे आहे. लोकांमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचं बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्हालाच चिन्हं मिळेल अशी आशा आहे. आमचा कोर्टावर विश्वास आहे, असं शंभुराज देसाई म्हणाले.

आमची सेना गावागावात गेलीय

जर आम्हाला धनुष्यबाण चिन्हं नाही मिळालं तर आमची सर्व बाजूने आमची तयारी आहे. आम्ही निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज आहोत. चिन्हं रुजवायला वेळ जाईल. पण आमची शिवसेना शाखां शाखापर्यंत आणि गावागावापर्यंत आम्ही पोहोचवली आहे, असा दावाही त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

आम्ही वैचारिक वारसदार

ज्वलंत हिंदुत्व कुणाकडे आहे हे लोकांना माहीत आहे. आमचं हजारो लोकांनी स्वागत केलं. लोकं आमच्या स्वागताला आजही येत असतात. शिंदे जातात तिथे लोक येत असतात. आमचा निर्णय योग्य असल्याचं सांगतात. आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार आहोत. ठाकरे परिवार संपत्ती आणि कुटुंबाचे वारसदार जरूर असतील. पण आम्ही वैचारिक वारसादार आहोत, असंही ते म्हणाले.

हिंदुत्वावादी मतांचं विभाजन होऊ नये

मनसे सोबत तुमची युती होणार का? असा सवाल केला असता त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत. ते निर्णय घेतील तो मान्य होईल. आम्ही 40 आमदार शिंदेंसोबत आहोत. जो निर्णय घ्यायचा त्याचा अधिकार शिंदे यांना दिला आहे,. हिंदुत्वावादी मतांचं विभाजन होऊ नये हे आम्हाला वाटतं, असं ते म्हणाले.

आमचाच मेळावा होणार

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार का? असा सवाल करताच दसरा मेळावा आमचाच होणार. शिवतिर्थावर आमचाच मेळावा होणार, असा दावाही त्यांनी केला.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.