शरद पवार यांच्या लबाडा घरच्या आवतानला जळजळीत प्रत्युत्तर… शंभुराज देसाई यांची पवार यांच्यावर टीका काय?
वी राणा आणी बच्चू कडू यांचे राजकीय मतभेद आपण पाहिलेत. मात्र आजच्या सरकारला दोघांनी पाठिंबा दिलाय. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांसोबत चर्चा करतील.
सातारा: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी भूविकास बँकेच्या कर्जमाफीवरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती. लबाडा घरचं आवतान जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही, असं शरद पवार म्हणाले होते. पवारांच्या या टीकेला शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री शंभुराज देसाई (shambhuraj desai) यांनी जळजळीत शब्दात टीका केली आहे. भूविकास बँकांच्याबाबत अनेक जिल्ह्यातून तक्रारी आल्या होत्या. महाविकास आघाडीच्या (mahavikas aghadi) सरकारने त्यांची कर्ज वसुली आणि त्यांच्या व्याजाची वसुली केली होती. तुम्हाला कर्जमाफी देता आली नाही. आम्ही ही कर्जमाफी दिली. त्याचं दु:ख रयतेचे राजे म्हणवणाऱ्यांना होत आहे, अशी टीका शंभुराजे देसाई यांनी केली.
शंभुराज देसाई यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावरही टीका केली. सध्या जे चालू आहे ते लोकशाहीला घातक आहे, असं रामराजे म्हणाले होते. नाईक-निंबाळकर यांच्या या विधानाचा शंभुराज देसाई यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. तुमचं सरकार आलं की लोकशाही असते आणि आमचं सरकार आल्यावरच लोकशाही संपली काय? असा सवाल शंभुराज देसाई यांनी केला.
रामराजे नाईक निंबाळकर यांची टीका उद्वेगातून होत आहे. खरं पाहता राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेपासून फार काळ लांब राहू शकत नाही. त्यामुळेच ते आगपाखड करत आहेत. पण एक सांगतो, पुढील 15 वर्ष राष्ट्रवादीला सत्तेत येऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
रवी राणा आणी बच्चू कडू यांचे राजकीय मतभेद आपण पाहिलेत. मात्र आजच्या सरकारला दोघांनी पाठिंबा दिलाय. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांसोबत चर्चा करतील. तसेच दोघांचे अंतर्गत मतभेद किंवा विचारांची मतभिन्नता संपवली जाईल. दोघांना समजावून आमचे वरिष्ठ नेते यातून मार्ग काढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात उत्साहाचं वातावरण पहायला मिळतंय. दिवाळी सणाचा उत्साह जनसामान्यांमध्ये पाहायला मिळत आहे. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या घरी सुद्धा दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी स्मिता देसाई यांनी त्यांचे औक्षण करत शुभेच्छा दिल्या. यावेळी सातारा जिल्ह्यातील नागरीक सुद्धा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी उपस्थिती होते. या दरम्यान राज्यातील नागरिकांना शंभुराज देसाई यांनी शुभेच्छा दिल्या.