James Lane Controversy: बाबासाहेब पुरंदरेंना डिग्री देताना शरद पवार काय म्हणाले होते? भाजप आमदाराने व्हिडीओच शेअर केला

Sharad Pawar on Babasaheb Purandare Video: हा विषय सुरु झाला तो, राज ठाकरेंच्या उत्तरसभेपासूनच. राज ठाकरेंनी पवारांना उद्देशून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास यावरुन भाष्य केलं होतं.

James Lane Controversy: बाबासाहेब पुरंदरेंना डिग्री देताना शरद पवार काय म्हणाले होते? भाजप आमदाराने व्हिडीओच शेअर केला
आता चर्चा जुन्या व्हिडीओची...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 1:20 PM

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि इतिहास हा विषय वेगवेगळ्या पद्धतीनं राज्यात चर्चेत येत असतो. आता पुन्हा एकदा हाच विषय जेम्स लेन प्रकरणावरुन (James Lane Controversy) चर्चेत आलंय. राज ठाकरेंनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला होता. पवारांच्या बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरील काही वक्तव्यांवरुन राज ठाकरेंनी समाचार घेतला होता. ठाण्यातील उत्तरसभेत बोलताना राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली होती. दरम्यान, राज ठाकरेंनी (Raj Thackeray) छेडलेल्या या विषयानंतर दुसऱ्याच दिवशी पवारांनी पत्रकार परिषद घेत त्यांना प्रत्युत्तर दिलं. या सगळ्या घडामोडीत थेट ज्येम्स लेनचीही प्रतिक्रिया समोर आली. त्यानंतर भाजपनही या सगळ्यात उडी घेत पवारांवर निशाणा साधलाय. भाजप आमदारांनी थेट पवारांचा जुना व्हिडीओ शेअर करत त्यांना टोला लगावला आहे. या व्हिडीओमध्ये शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदेर यांना पदवी प्रदान केली होती. त्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणात बाबासाहेब पुरंदरे यांचं कौतुकही केलं. हा व्हिडीओ शेअर करत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलंय, की… ‘पवारसाहेब या कोलांट्या पाहून तुम्हाला कधी कधी साष्टांग दंडवत घालावेसे वाटते’

भाजप आमदारांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहा..

या व्हिडीओमध्ये शरद पवार यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कामाचं, त्याच्या इतिहास अभ्यासातील योगदानाचं कौतुक केलंय. पुरंदरेंनी आपल्या व्याखानांमधून महाराष्ट्र आणि छत्रपती यांच्याबाबतही महत्त्वपूर्ण माहिती ही तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं मोलाचं काम केलंय. त्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलंय. त्यांच्यासारखा झोकून देऊन काम करणाऱ्या माणसाचा आज गौरव होतोय, याचा मला आनंद आहे, असंही यावेळी केलेल्या भाषणात म्हटलंय.

पवारांचा खोटारडेपणा?

दरम्यान, अतुल भातखळकर यांनी एक लिंक शेअर करत जेम्स लेन यांनं बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी कधी बोललोच नव्हतो, असं स्पष्ट केल्याचंही म्हटलंय. त्यामुळे महाराष्ट्रात विनाकारण पेटवपेटवी केल्याबद्दल आणि सातत्याने शिवशाहिरांबाबत गरळ ओकल्याबद्दल शरद पवार माफी मागणार आहेत का? राज्यात जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल पवारांविरुद्ध कारवाई व्हावी, असं भातखळकर म्हणालेत.

दरम्यान, हा विषय सुरु झाला तो, राज ठाकरेंच्या उत्तरसभेपासूनच. राज ठाकरेंनी पवारांना उद्देशून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास यावरुन भाष्य केलं होतं. राज ठाकरे यांनी म्हटलं होतं, की…

बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घराघरात पोहोचले. पण आम्हाला इतिहास बघायचा नाही. आम्हाला ते पुस्तक कोणत्या जातीच्या माणसानं लिहिलंय, ते बघायचंय. आम्ही छत्रपतींचा इतिहास सांगणार नाही. आम्ही मराठेशाहीचा इतिहास सांगताना त्यात फोड करणार की पेशव्यांनी केलेली गोष्ट वगैरे. शरद पवार साहेब, काय चाललंय?

राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देना शरद पवारांनीही निशाणा साधला होता. जेम्स लेनने शिवाजी महाराजांबद्दल जे गलिच्छ लिखाण केले त्याची माहिती बाबासाहेब पुरंदरे यांनी पुरविली होती, असा उल्लेख लेनच्या पुस्तकात आहे, असा दावा शरद पवारांनी पत्रकार परिषदेत केला होता. शरद पवार यांनी म्हटलं होतं की,..

जेम्स लेनने शिवाजी महाराजांवर काही लिहिलं. शहाजी राजे बाहेर होते. शिवछत्रपती आणि जिजामाता शिवनेरीवर राहत होते. दादोजी कोंडदेव त्या ठिकाणी कायम असत. महाराजांच्या वडिलांची उपस्थिती तिथे नव्हती. असं गलिच्छ लिखाण जेम्स लेनने केलं. त्याबाबत पुरंदेरेंनी सोलापूरला भाषण केलं. त्यात त्यांनी जेम्स लेनचं कौतुक केलं. जेम्स लेन हे चांगले शिवअभ्यासक आहे, असे उद्गार पुरंदरेंनी काढलं. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली. चीड निर्माण झाली.

दरम्यान, आता जेम्स लेननं म्हटलं की, छत्रपती शिवरायांचं पुस्तक लिहिताना पुरंदरेंची मला कोणतीही मदत झाली नाही. मला कुणीही माहिती पुरवली नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या पुस्तकात मी कोणतेही ऐतिहासिक तथ्य मांडले नाहीत, असे स्पष्टीकरण त्याने दिले आहे.

पण इतकी वर्ष जेम्ल लेन कुठं होता, तो आत्ता समोर आला की आणला गेला? दुसरं म्हणजे जेम्स लेनच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत पुरंदरेंचं नाव होतं, मग पुरंदरेंनी माहिती दिली नाही, हा दावा जेम्स लेन का करतोय, असे प्रश्न उभे केले जातायत. त्यामुळे कोण खरं आणि कोण खोटं, यावरुन चर्चांना उधाण आलंय.

संबंधित बातम्या:

James Laine : 20 वर्षानंतर जेम्स लेन बोलायला लागला, बाबासाहेब पुरंदरेंबाबत जेम्स काय म्हणतोय? वाचा

Pawar On James Laine Controversy : तेही गलिच्छ, शरद पवारांनी जळगावमध्ये बाबासाहेब पुरंदरेंचा शिवजयंतीवरचा माफीनामा वाचून दाखवला

पाहा स्पेशल रिपोर्ट : जेम्स लेन यांना कंठ फुटला

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.