अजित पवार नव्हे, ‘हा’ नेता फुटणार हे शरद पवार यांना आधीच माहीत होतं; जितेंद्र आव्हाड यांचा मोठा गौप्यस्फोट
यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर जोरदार टीका केली. सगळेच तुमच्या सारखे लाचार असतात असे नाही. या सत्ताधारी लोकांना लोकशाही टिकवायची नाही. ती पायदळी तुडवायची आहे. ट्रकवाल्यांच आंदोलन बघितलं ना? त्यामुळे केंद्र सरकारला हा कायदा मागे घ्यावा लागला आहे. या देशाला आंदोलनाची एक पाश्वभूमी आहे. त्यामुळे आंदोलन काय करू शकते हे सत्ताधाऱ्यांना माहीत आहे, असा घणाघाती हल्ला जितेंद्र आव्हाड यांनी चढवला.
अक्षय मंकनी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, शिर्डी | 3 जानेवारी 2023 : राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. अजित पवार यांनी बंड केल्याने राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अजितदादा यांचं हे राष्ट्रवादीतील दुसरं बंड आहे. पण अजित पवार पक्षातून पुन्हा फुटतील असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना वाटत नव्हतं. तर पक्षातील एक बडा खासदारच पक्षात बंड करेल, असं शरद पवार यांना वाटत होतं. तसं शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना बोलूनही दाखवलं होतं. जितेंद्र आव्हाड यांनीच त्याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचं आज शिर्डीत कार्यकर्ता शिबीर सुरू आहे. या शिबीरावेळी जितेंद्र आव्हाड यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला आहे. सुनील तटकरे हे इमान राखून नाहीत हे शरद पवार यांना माहीत होतं. त्यामुळे शरद पवार यांनी मला सांगितल होत की, सुनील तटकरे हे पुढील पाच वर्षात पक्षात टिकणार नाही, असा मोठा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. सुनील तटकरे हे दिवस रात्र शरद पवार यांच्याकडे येऊन एकच बोलायचे, चला ना भाजपसोबत जाऊ या. 2019 ला अजित पवार यांनी पहाटे शपथविधी घेतला. सुनील तटकरे तेव्हा शरद पवार यांच्या घरी सकाळी 8 वाजता आले. तुम्हाला वाटतं का सुनील तटकरे याना काही माहीत नाही? सुनील तटकरे यांच्या सारखा नटसम्राट मी पाहिला नाही, अशी जोरदार टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
रामाचं दर्शन घेण्याचा अधिकार नाही
तुम्ही काय अजित पवार यांना राम मादिरात जाऊन दर्शन देणार आहेत का? ज्या शरद पवारांच्या घरात राहून तुम्ही राजकरण केलं आणि त्यांना तुम्ही घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहात? त्यामुळे तुम्हाला रामाचं दर्शन घेण्याच अधिकार नाही, असं ते म्हणाले.
अजितदादांना झोप लागत नाही म्हणून…
अजित पवार यांनी आघाडीच्या सरकारमध्ये असताना बावनकुळे यांना किती मदत केली याची माहिती काढा. अजित पवार यांची वर्किंग स्टाईल वेगळी आहे. त्यांचा पॉलिसी मेकिंगचा एक तरी निर्णय मला त्यांनी सांगवा. शरद पवार यांचे पॉलिसीवर 100 निर्णय घेतले आहेत. अधिकाऱ्यांना लवकर उठवून काही काम होत नाही. अजित पवार यांना झोप लागत नाही त्यामुळे ते सकाळी 6 वाजता उठून काम करतात आणि त्यांचं अस वागणx अधिकाऱ्याना सुद्धा आवडत नाही, असा टोला त्यांनी लगावला. शिस्त म्हणजे (अजित पवार यांची नक्कल) प्रत्येक विभागात मधेमधे करणं… अनेक विभागांच्या विनापरवानगी बैठक लावणं असं नाही. उपमुख्यमंत्री पद हे असंवैधानिक आहे, असंही ते म्हणाले.