Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची तातडीची बैठक, शरद पवारांचा निर्णय, अजेंड्यावर ओला दुष्काळ की आघाडीतली धूसफुस?

गेल्या आठवड्यात राज्यात पावसाने धुमाकूळ घातला. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, आदी भागांत पावसाने दाणादाण उडवली. यामध्ये बळीराजाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची तातडीने बैठक बोलावली आहे.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची तातडीची बैठक, शरद पवारांचा निर्णय, अजेंड्यावर ओला दुष्काळ की आघाडीतली धूसफुस?
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 12:02 PM

मुंबई :  गेल्या आठवड्यात राज्यात पावसाने धुमाकूळ घातला. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, आदी भागांत पावसाने दाणादाण उडवली. यामध्ये बळीराजाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतचा आढावा शरद पवार या बैठकीत घेणार असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे या बैठकीत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड रचनेत झालेल्या बदलामुळे आघाडीतील धुसपूसीवरही चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या अनेक भागांत सध्या महापूर, अतिवृष्टीने हाहाकार उडवला आहे. मराठवाड्यात तर ‘पाणीच पाणी चहूकडे’ अशी स्थिती आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी तातडीच्या बैठकीचे आयोजन केलं आहे. 6 ऑक्‍टोबरला मुंबईतील पक्ष कार्यालयात ही बैठक होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे या बैठकीला सगळ्या मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिलेले आहेत.

बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

पावसामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक जिल्ह्यातील माहिती पवार या बैठकीत घेणार आहेत. कोणत्या विभागात किती नुकसान झालंय, पंचनामे झालेत का?, मदतीसंदर्भात काय करता येईल, याची चर्चा या बैठकीत होणे अपेक्षित आहे. तसंच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना त्या-त्या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागात दौरा करण्याच्या सूचना देखील पवार देण्याची शक्यता आहे.

बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार?

या बैठकीला स्वत: शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री छगन भुजबळ, राजेश टोपे, धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, दत्ता भरणे, संजय बनसोडे यांसह इतरही मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, मदतीकडे नजरा

तुफान पावसाने शेती, रस्ते, जनावरे, घरांची पडझड झाली असून पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास या अतिवृष्टीने हिरावून घेतला आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी असून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जात असले तरी मदत लवकर मिळाली तरच खऱ्या अर्थाने त्यांना दिलासा मिळणार आहे. केंद्र व राज्य सरकारने एकमेकांकडे बोट न दाखविता आणि राजकारण, आरोप प्रत्यारोपात वेळ वाया न घालता भरीव मदत करणे गरजेचे आहे.

(Sharad pawar Call meeting Maharashtra NCP Minister over review the damage Due to heavy rain)

हे ही वाचा :

उस्मानाबादेत 2 दिवसात 278 कोटींचं नुकसान, हिरवीगार शेती उद्धवस्त; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, मदतीकडे नजरा

महाराष्ट्रात संकटांची मालिका, मराठवाडा जलमय, केंद्र सरकारने भरीव निधी द्यावा : संजय राऊत

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.