AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामतीत पवारांनी बैठक बोलावली, अर्ध्या तासात एक कोटी रुपये जमले

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने जनजीवन विस्कळीत झालंय. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या विविध भागातून मदतीचा ओघ सुरु झालाय.

बारामतीत पवारांनी बैठक बोलावली, अर्ध्या तासात एक कोटी रुपये जमले
Follow us
| Updated on: Aug 09, 2019 | 6:24 PM

बारामती : राज्यातील सांगली, कोल्हापूर भागात पुराने अक्षरशः हाहाःकार माजवलाय. या पार्श्वभूमीवर माजी कृषीमंत्री शरद पवार (Baramati Sharad Pawar) यांनी बारामतीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बैठक घेत अर्ध्याच तासात तब्बल एक कोटी रुपयांची रोख मदत उभी केली. विशेष म्हणजे या रोख रक्कमेशिवाय अन्नधान्य, कपडे, औषधांसह गरजेच्या वस्तूही पाठवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. पवारांच्या (Baramati Sharad Pawar) आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळाला.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने जनजीवन विस्कळीत झालंय. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या विविध भागातून मदतीचा ओघ सुरु झालाय. शरद पवार यांनी विविध संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पूरग्रस्तांसाठी मदतीबाबत आवाहन केलं. या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थितांनी अर्ध्याच तासात एक कोटी रुपयांची रक्कम जाहीर केली. या रोख रक्कमेशिवाय धान्य, कपडे, औषधे आणि गरजेच्या वस्तूही देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ही सर्व मदत येत्या दोन दिवसात सांगली, कोल्हापूरसह विविध भागात पोहोचवली जाणार आहे.

याचवेळी शरद पवार हे अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 25 लाख असे एकूण 50 लाख रुपये देण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. या बैठकीत विविध संस्था, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वेच्छेने रोख स्वरुपात मदत देण्याचं जाहीर केलं. तर अनेक संस्था आणि व्यक्तींच्या वतीने वेगवेगळ्या वस्तू स्वरूपातील मदत पूरग्रस्तांना पाठवली जाणार आहे.

येत्या दोन दिवसात बारामतीतून आणखी मदत जमा करुन ती पूरग्रस्तांना पाठवली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या वतीने गुरुवारी कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांसाठी 50 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार एक महिन्याचं वेतन या नैसर्गिक आपत्तीसाठी देतील आणि हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. या परिस्थितीमध्ये सर्वांनी मदतीसाठी पुढे यावं, असं आवाहनही शरद पवारांनी केलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?.
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.