Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jitendra Awhad : ‘तुम्ही सांगाल औरंगजेबाला मारलं नव्हतं, त्याला हार्ट ॲटेक आलेला’ जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य

Jitendra Awhad : पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे अजूनही फरार आहे. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी डॉन चित्रपटातील डायलॉग मारुन दाखवला. 'आपटेला पकडणं मुश्किल ही नाही नामुंमकीन हैं'

Jitendra Awhad : 'तुम्ही सांगाल औरंगजेबाला मारलं नव्हतं, त्याला हार्ट ॲटेक आलेला' जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य
Jitendra awhad
Follow us
| Updated on: Sep 03, 2024 | 12:49 PM

“न्यायालयाकडून प्रत्येक भारतीयाला अपेक्षा आहेत. सुप्रीम कोर्ट योग्य न्याय देईल ही आम्हाला अपेक्षा आहे. आम्हाला असं वाटतय की सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींन याची कल्पना आहे. पैशाने सरकार पाडणे हे पुढच्या लोकशाहीसाठी घातक आहे” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. “राष्ट्रपती शासन लावले जाईल की नाही माहीत नाही, पण संविधानाच्या कलम 10 चा अपमान झाला आहे. हे सगळं आपण रोखलं नाही तर 3-4 हजार कोटींमध्ये पुढची सरकार पाडली जातील” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ‘निवडणुका पुढे गेल्या, त्याचा अजूनही लोकांच्या मनात राग आहे’ असं आव्हाड म्हणाले.

मालवणात राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मागच्या आठवड्यात कोसळला. या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे अजूनही फरार आहे. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी डॉन चित्रपटातील डायलॉग मारुन दाखवला. ‘आपटेला पकडणं मुश्किल ही नाही नामुंमकीन हैं’ “कुठलाही अनुभव नसलेल्या जयदीपला कोणी हे काम दिलं ते लोक देखील तेवढीच दोषी आहेत” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

‘शाहूंचे ओरिजनल रक्त शरद पवार यांना साथ देणारच’

“शाहूंचे विचार पाळणारा पक्ष म्हणजे शरद पवार यांचा पक्ष. शाहूंचे ओरिजनल रक्त शरद पवार यांना साथ देणारच” असं शरद पवारांच्या कोल्हापुर दौऱ्यावर आव्हाड म्हणाले. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दलही ते बोलले. “निवडणुका पुढे जात आहेत. त्यामुळे जागावाटप गणपती नंतर होईल” असं त्यांनी सांगितलं.

सूरतेबद्दल जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

शिवरायांनी सुरतेची लूट केली नसून त्यांनी सुरतेवर आक्रमण केल्याचं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. त्यावर जितेंद्र आव्हाड बोलले आहेत. “मराठ्यांच्या इतिहासाच विकृतीकरण करणं, हा अनेक वर्ष मनुवाद्यांचा प्रयत्न होता. औरंगजेबाच्या पुत्राने लिहिलेल्या पुस्तकात देखील सुरत लुटीचा उल्लेख आहे. मुघलांना कमकुवत करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. सुरत हे पैसे देणारं अभिनव केंद्र होतं, म्हणून सुरतेची लूट केली होती. काही वर्षांनी तुम्ही सांगाल औरंगजेबाला मारलं नव्हतं, त्याला हार्ट अटॅक आला होता. शिवाजी महाराज यांना लहान करण्याचा प्रयत्न करू नका, त्यांना बदनाम करु नका” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या.
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?.
वाह.. फरफटत नेले, हल्ला केला तरीही 'ती' भिडली चोरट्यांना अन्...
वाह.. फरफटत नेले, हल्ला केला तरीही 'ती' भिडली चोरट्यांना अन्....
दानवेंच्या नावाचं गार्‍हाणं घेऊन खैरे मातोश्रीवर दाखल
दानवेंच्या नावाचं गार्‍हाणं घेऊन खैरे मातोश्रीवर दाखल.
मुंडेंची सर्व कुंडली कराडकडे..., करूणा शर्मांकडून एन्काऊंटरची भीती अन्
मुंडेंची सर्व कुंडली कराडकडे..., करूणा शर्मांकडून एन्काऊंटरची भीती अन्.
'मुंडेंनाच कराड नको', म्हणणाऱ्या निलंबित PSI वर अ‍ॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा
'मुंडेंनाच कराड नको', म्हणणाऱ्या निलंबित PSI वर अ‍ॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा.
भिडे गुरुजींना कुत्र्याचा कडकडून चावा; काय आहे प्रकृतीचे अपडेट?
भिडे गुरुजींना कुत्र्याचा कडकडून चावा; काय आहे प्रकृतीचे अपडेट?.
'छावा फिल्म वाईट अन्..', 'छावा'तल्या अभिनेत्याचा काही दृश्यांवर आक्षेप
'छावा फिल्म वाईट अन्..', 'छावा'तल्या अभिनेत्याचा काही दृश्यांवर आक्षेप.
संभाजी भिडेंना कुत्रं चावल्यावर सांगली पालिका अ‍ॅक्शन मोडवर
संभाजी भिडेंना कुत्रं चावल्यावर सांगली पालिका अ‍ॅक्शन मोडवर.