Chitra Wagh : ‘त्या’ पेन ड्राइव्हमध्ये चित्रा वाघ यांचे काय कारनामे? 3 वाजता पोलखोल, पवार गटाच्या महिला नेत्याची धमकी

Chitra Wagh : अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. त्यावरुन महाराष्ट्रात राजकारण रंगलं आहे. आता या राजकीय लढाईत दोन महिला नेत्यांमध्ये शाब्दीक द्वंद सुरु झालय. शरद पवार गटाच्या एका महिला नेत्याने चित्रा वाघ यांना त्यांचे कारनामे उघड करण्याची धमकी दिली आहे. त्यासाठी त्यांच्याकडे असलेला पेन ड्राइव्ह सुद्धा त्यांनी दाखवला.

Chitra Wagh : 'त्या' पेन ड्राइव्हमध्ये चित्रा वाघ यांचे काय कारनामे? 3 वाजता पोलखोल, पवार गटाच्या महिला नेत्याची धमकी
Chitra WaghImage Credit source: Twitter/@ChitraKWagh
Follow us
| Updated on: Jul 30, 2024 | 1:14 PM

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपावरुन महाराष्ट्रात नवीन राजकारण सुरु झालं आहे. आपण गृहमंत्री असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी ऑफर दिली होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी केला आहे. त्यांच्या याच आरोपांवर देशमुखांनी पुरावे द्यावेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. या वादात आता भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांचे कारनामे उघड करण्याची धमकी देण्यात आली आहे.

अनिल देशमुखांनी फडणवीसांबाबत पुरावे दिले, तर पुढच्या 3 तासात त्यांचा पदार्फाश करु असं आव्हान चित्र वाघ यांनी अनिल देशमुखांना दिलं होतं. त्यावर शरद पवार गटाच्या महिला नेत्या विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्याकडे पेन ड्राइव्ह आहे, त्यात चित्रा वाघ यांचे कारनामे आहेत असा इशारा विद्या चव्हाण यांनी दिला आहे. “फोटोला फोटोने उत्तर आम्हालाही देता येतं. यात कसला आला पराक्रम अनिलबाबू. अनिल देशमुखांना माझा सवाल आहे, आम्ही तुमच्याकडे पुरावे मागितलेत, ते तुम्ही का देत नाहीय? एकदा तुम्ही पुरावे द्या, मग त्यानंतरच्या तीन तासात तुमचा पदार्फाश करणारे पुरावे आमच्याकडे सज्ज आहेत” असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला. त्याला विद्या चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलय.

‘महाराष्ट्राच्या जनतेला तुझं खर रुप दाखवल्याशिवाय  राहणार नाही’

“या  पेन ड्राइव्हमध्ये चित्रा वाघचे सगळे कारनामे आहेत, चित्रा वाघ काय-काय बोलते आणि काय-काय करते, तिचे कारनामे या पेन ड्राइव्हमध्ये आहेत. 3 वाजता राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये हे उघड करणार. महाराष्ट्राच्या जनतेला तुझं खर रुप दाखवल्याशिवाय विद्या चव्हाण राहणार नाही हे लक्षात ठेवं” अशा इशारा चित्रा वाघ यांना देण्यात आलाय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.