Sharad Pawar Corona Update : पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस, शरद पवारांनी मानले आभार

शरद पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याबाबतची माहितीही पवार यांनी दिलीय. त्याचबरोबर पवार यांनी पंतप्रधान मोदींचे आभारही मानले आहेत.

Sharad Pawar Corona Update : पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस, शरद पवारांनी मानले आभार
शरद पवार, नरेंद्र मोदी (File Photo)
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 4:25 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यासंदर्भात स्वत: पवार यांनी ट्विटरवरुन माहिती दिलीय. दरम्यान, पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शरद पवार यांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याबाबतची माहितीही पवार यांनी दिलीय. त्याचबरोबर पवार यांनी पंतप्रधान मोदींचे आभारही मानले आहेत.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी फोन केला. त्यांच्या काळजीबाबत आणि शुभेच्छांबद्दल मी आभारी आहे’, असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे.

दरम्यान, पवार यांनी दुपारी आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली. ‘माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावीट, असं आवाहन पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे.

चंद्रकांत पाटलांची अंबाबाई चरणी प्रार्थना

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही शरद पवार यांच्या प्रकृतीसाठी अंबाबाई चरणी प्रार्थना करत असल्याचं ट्वीट केलं आहे.

शरद पवार यांचे नियोजित कार्यक्रम रद्द?

राज्य महिला आयोगाच्या 29 व्या वर्धापन दिनानिमित्त 25 जानेवारीला मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, आता त्यांना कोरोना संसर्ग झाल्यानं ते अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.

तिसऱ्या लाटेत अनेक नेतेमंडळी कोरोनाच्या कचाट्यात

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत राजकीय नेतेमंडळींना कोरोनाने मोठ्या प्रमाणात ग्रासल्याचं पाहायला मिळालं. कारण, शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्याचबरोबर आमदार रोहित पवार, खासदार पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह सर्वपक्षीय आमदार, खासदार आणि नेतेमंडळी कोरोना पॉझिटिव्ह आले होते.

राज्यातील कोरोना स्थिती

दरम्यान, काल दिवसभरात राज्यात 40 हजार 805 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 27 हजार 377 जण कोरोनामुक्त झाले. राज्यात काल 44 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, काल राज्यात एकही ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आला नाही. मात्र, राज्यातील एकूण ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 24 ङजार 759 वर पोहोचली आहे.

इतर बातम्या : 

पत्रकारांच्या प्रश्नावर राऊत हसले, नंतर म्हणाले त्यासाठी रंजन गोगोईंना खासदार केलं, फडणवीसांचा राम मंदिराचा दावा राऊतांनी फोडून दाखवला

मी काय आहे आणि कोण आहे हे सलमानला दाखवून देईन, बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर अभिजीत बिचुकलेचा संताप

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.