‘तुकड्यावर जगणारांनी शहाणपणा शिकवू नये’, सदाभाऊंचा मिटकरींवर पलटवार; पवारांवरील टीकेवरुन दोघांत जुंपली

सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आमदार अमोल मिटकरी आणि सदाभाऊ यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर शेकल्या शब्दात टीका करताना पाहायला मिळत आहे.

'तुकड्यावर जगणारांनी शहाणपणा शिकवू नये', सदाभाऊंचा मिटकरींवर पलटवार; पवारांवरील टीकेवरुन दोघांत जुंपली
सदाभाऊ खोत, अमोल मिटकरीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 5:44 PM

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. ‘शरद पवार साहेब हे महान नेते आहेत. त्यांनी राज्यात काड्या करण्याशिवाय काहीही केले नाही. त्यांनी जाईल तिथे लाग लावायची आणि पुढच्या घरात आग लावायला निघून जायचे. आयुष्यभर त्यांनी आग लावायचे काम केले. मला वाटते त्यांचे आडनाव आता पवार ऐवजी आगलावे असे करावं, अशी खरमरीत टीका सदाभाऊंनी केली होती. त्यावर अमोल मिटकरी यांनीही सदाभाऊंना जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर पुन्हा एकदा खोतांनी मिटकरींवर पलटवार केलाय.

सदाभाऊची गत पाण्याविना मासोळी – मिटकरी

सदाभाऊ खोत यांनी पवारांवर केलेलेल्या टीकेला खोतांनी प्रत्युत्तर दिलं. सदाभाऊ खोत यांची आमदारकी जात आहे, त्यामुळे आमदारकी टिकवण्यासाठी त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात घरा घरात आग लावण्याचं काम भाजप कसं करतंय, हे अवघ्या देशाला माहीत आहे. काश्मीर फाईलच्या माध्यमातून दोन धर्मात आग लावण्याचा प्रयत्न केलाय. आता सदाभाऊची गत पाण्याविना मासोळी अशी झाली आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. तसंच सदाभाऊ हे स्वत: बोलत नाहीत, तर त्यांचे मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस बोलतात, असा टोलाही मिटकरींनी लगावलाय.

मी आमदार, खासदार जन्माला घालणारा माणूस – सदाभाऊ

मिटकरींच्या या टीकेला आता सदाभाऊंनीही प्रत्युत्तर दिलंय. अमोल मिटकरींना माहिती नाही. मी आमदार, खासदार जन्माला घालणारा माणूस आहे. त्यामुळे तुकड्यावर जगणाऱ्या माणसांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये. बाजारू भाषणं करायची… त्यामुळे सदाभाऊ सुपारी बहाद्दर नाही. तुम्ही सुपारी घेऊन ढोल-ताशा वाजवणाऱ्या बँडबाजावाले आहात. त्यामुळे तुमच्या वक्तव्याला महत्वं द्यावं असं काही नाही. वसंतदादांच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला याचा अभ्यास अमोल मिटकरींनी करावा. अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी मिटकरींवर पलटवार केलाय. अमोल एक चांगला वक्ता आहे. त्याच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. पण अमोलने राजकारणाच्या या गटारगंरेत आपली वक्तृत्वाची तलवार चालवू नये, असा सल्लाही खोतांनी यावेळी दिलाय.

इतर बातम्या : 

UPA च्या अध्यक्षपदाचा मुद्दा पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पवारांच्या उपस्थितीत दिल्लीत महत्वाचा ठराव

Assam Meghalaya Border Dispute: आसाम-मेघालयाचा 50 वर्ष जुना सीमा वाद मिटला, शहांची शिष्टाई; महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाचं काय?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.