सुप्रिया सुळे यांनाच राष्ट्रीय अध्यक्ष करायचं होतं, अजितदादा यांनी केली शरद पवार यांच्या राजकारणाचीच चिरफाड

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर पहिल्यांदाच जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या राजकारणाचीच चिरफाड केली.

सुप्रिया सुळे यांनाच राष्ट्रीय अध्यक्ष करायचं होतं, अजितदादा यांनी केली शरद पवार यांच्या राजकारणाचीच चिरफाड
अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे हे पत्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याआधीच 30 जुन रोजी दिले होते. Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 3:26 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पहिल्यांदाच थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. अजित पवार यांनी नुसती शरद पवार यांच्यावर टीकाच केली नाही तर शरद पवार यांच्या राजकारणाची पोलखोलही केली आहे. तसेच पवारांच्या धरसोडवृत्तीवरही बोट ठेवलं आहे. एवढंच नव्हे तर शरद पवार मुलीला राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी कसे प्रयत्न करत होते, याचीही माहिती उघड केली आहे. तसेच शरद पवार यांना राजकारणातून निवृत्ती घेण्याचं जाहीर आवाहनही केलं आहे.

अडिचत पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा वांद्रे येथील एमईटी मैदानावर मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी शरद पवार यांची अनेक गुपित उघड केली. नोकरीनंतर माणूस 58 व्या वर्षी निवृत्त होतो. आयएएस असेल तर 60 व्या वर्षी निवृत्त होतो. भाजपने तर राजकारणातील निवृत्तीचं वय 75 केलं आहे. आमच्या हातात पक्ष द्या. निवृत्त व्हा. आराम करा. आम्हाला मार्गदर्शन करा. तुम्ही सांगा ना. चुकलं तर चुकलं सांगा ना. आम्ही चूक दुरूस्त करून पुढे जाऊ. का हे केलं जातं? कशासाठी केलं जातं?आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? असा सवाल अजित पवार यांनी केला.

हे सुद्धा वाचा

तुम्ही थांबणार आहात की नाही?

वय जास्त झालं. 82 झालं , 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? तुम्ही आशीर्वाद द्या. तुम्ही शतायुषी व्हा. मला सांगितलं राजीनामा देतो आणि संस्थेची कामे पाहतो. राजीनामा दिल्यावर एक कमिटी करतो. ती कमिटी केल्यावर तुम्ही बसा. आणि बसून सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा. आम्ही तयार झालो. तेही आम्हाला मान्य होतं. त्यानंतर दोन दिवसात सांगितलं राजीनामा मागे घेतला. मागे घेतला तर दिला कशाला? मी सुप्रियाला सांगितलं त्यांना सांग. ते हट्टी आहेत. पण असा कुठला हट्ट आहे. आमदारांना फोन केला जात आहे. ते भेटले नाही तर त्याच्या पत्नीला फोन करून भावनिक केलं जातं, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

सोनिया गांधींना परदेशी ठरवलं

1999ला निवडणूक घेतल्या. तेव्हा काँग्रेस एकत्र होती. त्यानंतर सोनिया गांधी परदेशी आहे, असं सांगितलं. परदेशी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकत नाही, असं सांगितलं. आम्ही ऐकलं. त्यानंतर राष्ट्रवादीचा जन्म झाला. चार महिन्यात निवडणुका लागल्या. त्यावेळी संपूर्ण मैदान गाजवण्याचं काम भुजबळ यांनी केलं. आर आर पाटील, सुनील तटकरे, जयंत पाटील, मी आम्ही सर्व तरुण होतो. काही तरी करावं आम्हाला वाटत होतं. सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवायचा होता. पण त्यावेळी आपल्याला फक्त 58 जागा मिळाल्या. काँग्रेसला राज्यात ताकदीचा नेता नसताना 78 जागा मिळाल्या. विलासराव मुख्यमंत्री झाले. आम्ही सत्तेत गेलो. कामे केली, असं त्यांनी सांगितलं.

मला फक्त सात जिल्ह्याचं खातं मिळालं. प्रशासनावर माझी पकड आहे की नाही हे महाराष्ट्र जाणतो. मी जातीपातीचं नात्यागोत्याचं काम केलं नाही. प्रत्येक कार्यकर्त्याचं काम करतो. पहाटे कामाला सुरुवात करतो. आजही करतो. महाराष्ट्र पुढे जावं म्हणून हे करत असतो. देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य म्हणून मी काम करत असतो, असंही त्यांनी सांगितलं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.