Sharad Pawar : आता बंड व्यवस्थापनाचं केंद्र ‘सिल्व्हर ओक’वर, शरद पवारांच्या नेतृत्वात मविआची बैठक सुरू

Sharad Pawar : शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओक येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीला शिवसेनेचे अनिल देसाई, काँग्रेसचे नेते अशोच चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि अनिल परब उपस्थित आहेत.

Sharad Pawar : आता बंड व्यवस्थापनाचं केंद्र 'सिल्व्हर ओक'वर, शरद पवारांच्या नेतृत्वात मविआची बैठक सुरू
खा. शरद पवारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 10:38 AM

मुंबई: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या बंडाला सहा दिवस होत आले आहेत. मात्र, अजूनही शिंदे आपल्या बंडखोर आमदारांसह माघारी फिरण्यास तयारी नाहीत. त्यामुळे आघाडीमध्ये चिंता निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी प्रत्यक्ष भेटून आणि मोबाईलवरून संपर्क साधूनही शिंदे ऐकायला तयार नसल्याने आता शिंदे यांचं बंड थोपवण्यासाठी साक्षात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) मैदानात उतरले आहेत. पवारांनी आतापर्यंत दोन ते तीन वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आज पवारांच्या निवासस्थानी आता मविआच्या नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. शिंदे यांचं बंड थोपवण्यासह पुढे काय करायचं याबाबत या बैठकीत चर्चा सुरू आहे. गेल्या तासाभरापासून ही बैठक सुरू आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिंदे यांचं बंड थोपवण्यात पवारांना यश येईल का? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओक येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीला शिवसेनेचे अनिल देसाई, काँग्रेसचे नेते अशोच चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि अनिल परब उपस्थित आहेत. या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात येणार आहे. राजकीय अस्थिरतेवर काढावयाचा तोडगा आणि कायदेशीर बाबींवरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच अशा परिस्थितीत शिंदे गट काय काय निर्णय घेऊ शकतो, भाजपची काय खेळी असू शकते, राज्यपाल काय भूमिका घेऊ शकतात, अविश्वास प्रस्ताव असल्याने विधानसभेचे उपसभापतींना किती अधिकार असू शकतात, या सर्व गोष्टींवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

प्रोटेम स्पीकर नेमण्यावरही चर्चा?

या बैठकीत प्रोटेम स्पीकर नियुक्त करण्यावरही चर्चा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नरहरी झिरवळ यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे झिरवळ यांना आमदारांना निलंबित करण्याचा अधिकार नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे बंडखोर कोर्टात जाऊन झिरवळ यांच्या निर्णयाला आव्हान देऊ शकतात. अशावेळी आघाडी सरकार अडचणीत येऊ शकतं. त्यामुळे प्रोटेम स्पीकर नेमून सर्व निर्णय घेण्यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

देसाई, परबांकडे कायदेशीर जबाबदारी

शिवसेनेने अनिल देसाई आणि अनिल परब यांच्याकडे कायदेशीर जबाबदारी दिली आहे. त्यामुळे पवार या बैठकीत या दोन्ही नेत्यांकडून कायदेशीर बाबी जाणून घेतील. तसेच पुढे काय करायचे याबाबत सल्लाही देतील असं सांगितलं जात आहे. त्यामुळे या बैठकीकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.