Sharad Pawar : 82 वर्षांचे शरद पवार कुस्तीच्या आखाड्यात म्हणतात, ‘अजून मी म्हातारा नाही’!

आज खुद्द शरद पवार यांनीही 'मी अजूनही म्हातारा झालो नाही' असं थेट कुस्तीच्या मैदानातून सांगितलंय! शिरुर येथे रामलिंग महाराज यात्रोत्सवात आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्याला पवार उपस्थित होते.

Sharad Pawar : 82 वर्षांचे शरद पवार कुस्तीच्या आखाड्यात म्हणतात, 'अजून मी म्हातारा नाही'!
शिरुरमधील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत शरद पवारांची उपस्थितीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 11:41 PM

सुनिल ठिगळे, पुणे : 2019 ची विधानसभा निवडणूक शरद पवारांनी (Sharad Pawar) गाजवली. अनेक नेते राष्ट्रवादी सोडून भाजपची कास धरत होते. शरद पवारांचे अनेक निकटवर्तीयही त्यांची साथ सोडून जात होते. त्यावेळी एकट्या शरद पवारांनी महाराष्ट्र (Maharashtra) पिंजून काढत राष्ट्रवादी काँग्रेसला नवी ऊर्जा दिली. त्यावेळी अनेक पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांनी पवारांचा उल्लेख ’78 वर्षाचा तरुण’ असा केला. त्यानंतर आज खुद्द शरद पवार यांनीही ‘मी अजूनही म्हातारा झालो नाही’ असं थेट कुस्तीच्या मैदानातून (Wrestling ground) सांगितलंय! शिरुर येथे रामलिंग महाराज यात्रोत्सवात आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्याला पवार उपस्थित होते.

व्यासपीठावर बोलताना आयोजकांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला. त्यानंतर बोलण्यासाठी उभे राहिलेल्या शरद पवारांनी अगदी मिश्किलपणे मी अजून म्हातारा झालो नाही. आयोजक बोलले की या वयात… मी आयोजकांवर नाराज आहे, असं म्हटलं. पवार पुढे म्हणाले की, ‘कुस्तीगीर परिषदेचा माझा जुना संबंध आहे. मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. नवनवीन पैलवान तयार होत आहेत याचा आनंद आहे. राजकारण एका बाजूला आणि क्रीडा श्रेत्र एका बाजूला. मी क्रीडा क्षेत्रात कधी राजकारण येऊ देत नाही आणि राजकारणात जेव्हा कुस्ती करायची तेव्हा कुस्ती करायची’, अशा शब्दात पवारांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना इशाराही दिलाय.

’82 वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा नाही’

शरद पवार रविवारी पक्षाच्या मेळाव्यासाठी उस्मानाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळीही पवारांनी आपण म्हातारे झालो नसल्याचं म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमधून झालेलं पक्षांतर, उस्मानाबादचा पाणी प्रश्न, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वक्तव्य, देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या वक्तव्यावर शरद पवारांना टोले मारले. तर, उद्धव ठाकरे चांगला राज्य कारभार चालवत आहेत, असं शरद पवार म्हणाले. सतत 52 वर्ष काम करण्याची संधी मला दिली. त्या समाजाचे आणि लोकांच्या भविष्य उज्वल करण्याची जबाबदारी माझी आहे. चार चार वेळा मुख्यमंत्री केलं 82 वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा नाही मी कधीच थकणार नाही, असं शरद पवार म्हणाले. यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीला जे सोडून गेले ते सोडून गेले त्यांची चिंता करण्याची गरज नाही, असं म्हटलं.

इतर बातम्या :

Sadabhau Khot : येणारे येतीलचं, पण तुमच्या नशिबी पंतप्रधान पदाची खुर्ची नाही, सदाभाऊ खोत यांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला NMCची मान्यता, महापौरांच्या प्रयत्नांना यश

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.