शरद पवारांची अवस्था ‘शोले’तल्या जेलरसारखी : मुख्यमंत्री

उल्हासनगरमध्ये महायुतीचे उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी (Sharad pawar Devendra Fadnavis) काँग्रेसवरही टीका केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी बँकॉकला निघून गेलेत, प्रतिस्पर्धी कुणीही राहिलेलं नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

शरद पवारांची अवस्था 'शोले'तल्या जेलरसारखी : मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Oct 11, 2019 | 8:58 PM

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अवस्था सध्या शोले सिनेमातल्या जेलरसारखी झाल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Sharad pawar Devendra Fadnavis) यांनी केली. उल्हासनगरमध्ये महायुतीचे उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी (Sharad pawar Devendra Fadnavis) काँग्रेसवरही टीका केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी बँकॉकला निघून गेलेत, प्रतिस्पर्धी कुणीही राहिलेलं नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

यंदाच्या निवडणुकीत कुणी प्रतिस्पर्धीच नसल्याने निवडणुकीला मजा येत नाही. एकीकडे राहुल गांधी बँकॉकला निघून गेलेत, तर शरद पवारांची अवस्था आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पिछे आओ, अशी झाली असून त्यांच्यासोबत कुणीच नसल्याची बोचरी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

विरोधकांच्या जाहिरनाम्याचीही मुख्यमंत्र्यांनी खिल्ली उडवली. विरोधकांनी जाहिरनाम्यात इतकी आश्वासने दिली आहेत, की ते पाहून महाराष्ट्रात प्रत्येकाला ताजमहाल बांधून देऊ, महाराष्ट्रात प्रत्येकाला चंद्रावर नेऊ, अशीही आश्वासने उद्या देतील, असा टोला त्यांनी लगावला.

यावेळी उल्हासनगरात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला असून वाढीव एफएसआय देऊन ही बांधकामं नियमित करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. तसंच येत्या काळात उल्हासनगरात मेट्रो आणून मेट्रो स्टेशनला सिंधूनगर नाव देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. यावेळी भाजपच्या जाहीरनाम्याचं प्रकाशनही करण्यात आलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.