कोणत्याही प्रकारची धमकी आलेली नाही, शरद पवार काय म्हणाले ?
शरद पवार यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे. tv9शी बोलताना शरद पवार यांनी अशी कोणतीही धमकी आली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar ) यांना धमकी आल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवार सोलापूरच्या कुर्डुवाडीचा दौरा नियोजीत होताय. कुर्डुवाडीच्या दौऱयावर येवू नका अशी धमकी पवारांना आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र खुद्द शरद पवार यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे. tv9शी बोलताना शरद पवार यांनी अशी कोणतीही धमकी आली नसल्याचे स्पष्ट केले आहे. कुर्डुवाडीचा त्यांचा दौराही त्यांनी ठरल्याप्रमाणे केला आहे.
शरद पवार काय म्हणाले ?
शरद पवार यांना धमी आल्याचे वृत्त राजकीय वर्तुळात पसरल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर टीव्ही९ने(tv9) स्वत: शरद पवारांशी संपर्क साधला.
यावेळी शरद पवार म्हणाले की, अशा प्रकारची कोणतीही धमकी मला आलेली नाही. याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलेले आहे.
काय होती धमकीची अफवा
शरद पवार आज कुर्डुवाडीच्या दौऱ्य़ावर होते. या दौऱ्याला पवारांनी येू नये, अशा आशयाची धमकी त्यांना एका अज्ञात इसमाने दिल्याची अफवा पसरलेली होती.
मात्र, शरद पवारांकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यांनी त्यांचा कुर्डुवाडीचा दौराही नियमितपणे केला. आता याबाबत पवारांनीच स्पष्टीकरण दिल्यामुळे ही धमकीची अफवाच होती, हे स्पष्ट झालेले आहे.