Sharad Pawar Modi Meet : मंत्रिमंडळ बदलांसह ईडी कारवाईपर्यंत! पवारांच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे

Sharad Pawar Modi Meet : नवी दिल्लीत झालेल्या चर्चेत शरद पवार यांनी मोदींसोबत वीस ते पंचवीस मिनिटं चर्चा केली होती. या चर्चेत नेमकं काय झालं, यावरुन तर्क वितर्क लढवले जात होते.

Sharad Pawar Modi Meet : मंत्रिमंडळ बदलांसह ईडी कारवाईपर्यंत! पवारांच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे
नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 5:29 PM

नवी दिल्ली : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar Modi Meet) नवी दिल्लीत पत्रकार परिषद (Press Conference) पार पडली. नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पवार या पत्रकार परिषदेमध्ये काय बोलतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. या पत्रकार परिषदेत लक्षद्वीप प्रश्नासर शरद पवारांची मोदींसोबत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या दृष्टीनं नेमकी काय महत्त्वपूर्ण चर्चा झाली, याबाबत आता खुलासे करण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet) बदलांसोबतच राज्यातील वाढलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारावायांपर्यंत शरद पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय म्हटलं? हे जाणून घेणार आहोत दहा मोठ्या मुद्द्यांमधून..

TOP 10 : शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील मोठे मुद्दे

  1. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार 5 वर्ष टिकणार
  2. राज्याच्या मंत्रिमंडळात कोणतेही बदल नाहीत
  3. राज्यपालांनी 12 आमदारांवर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही
  4. 12 आमदारांच्या प्रश्नावर मोदी विचार करुन काय निर्णय घेतात ते बघुयात
  5. संजय राऊतांच्या कारवाईबाबत नरेंद्र मोदींना सांगितलं आहे
  6. नवाब मलिकांच्या कारवाईवर कोणतीही चर्चा मोदी भेटीमध्ये झाली नाही
  7. राज्यातील कारवायांबाबत मोदींसोबत चर्चा नाही
  8. राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपविरोधात एकत्र उभी आहे
  9. इतरांच्या सांगण्यावरुन भाजपसोबत राष्ट्रवादी मुळीच जाणार नाही
  10. मविआ सरकारला कोणताही धोका नाही, पुन्हा सत्तेत येऊ

पवारांच्या भेटीचं टायमिंग!

गेल्या 15 दिवसांत शिवसेनेच्या तीन नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केली. दरम्यान, मंगळवारी (5 एप्रिल) रोजी शिवसेनेचे धडाडीचे नेते आणि राज्यसभा खासदार यांच्या दादरमधील घरावर टाच आणली. याशिवाय त्यांच्या जवळच्या असलेल्या प्रवीण राऊत आणि पाटकर यांच्या संपत्तीवर जप्ती आणण्यात आली होती. ही कारवाई झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार मोदींची भेट घेण्यासाठी गेले असल्याकारणानं, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.

किती वेळ चर्चा केली होती?

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी याआधी अनेकदा नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे. राज्यातील भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा संघर्ष अनेकदा ताणला जातो आहेत. अशातच शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चा होणंही स्वाभाविकच आहे. दरम्यान, नवी दिल्लीत झालेल्या चर्चेत शरद पवार यांनी मोदींसोबत वीस ते पंचवीस मिनिटं चर्चा केली होती. या चर्चेत नेमकं काय झालं, यावरुन तर्क वितर्क लढवले जात होते. दरम्यान, शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या भेटीबाबत खुलासे करत पत्रकारांच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांनाही उत्तरं दिली. त्यावेळी त्यांनी महत्त्वाची वक्तव्य ही महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केली.

पाहा शरद पवार यांची संपूर्ण पत्रकार परिषद :

संबंधित बातम्या :

संजय राऊतांविरोधात कारवाईची गरज काय?; राऊतांवर अन्याय झाल्याची पवारांची मोदींकडे तक्रार

केंद्रीय तपास यंत्रणा ‘मातोश्री’पर्यंत पोहोचल्या म्हणून तुम्ही मोदींना भेटलात? पवार म्हणतात, नाही नाही…

अडीच वर्ष झाले तरी राज्यपालांकडून विधान परिषद सदस्यांची नियुक्ती नाही; पवारांची राज्यपालांविरोधात मोदींकडे तक्रार

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.