जावेद अख्तर ते प्रितीश नंदी, यशवंत सिन्हा ते फारुक अब्दुल्ला, शरद पवारांच्या बैठकीला कोण कोण येणार?
शरद पवारांच्या दिल्लीतील 6 जनपथवरील निवासस्थानी मंगळवारी 15 राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या बैठकीला तृणूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियासह अनेक प्रादेशिक पक्षांचे नेतेही उपस्थित राहणार आहेत.
मुंबई : भाजप आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधी पक्षाची मोट बांधण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवार यांनी आज राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत तब्बल 2 तास चर्चा केली. त्यानंतर पवारांच्या दिल्लीतील 6 जनपथवरील निवासस्थानी मंगळवारी 15 राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या बैठकीला तृणूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियासह अनेक प्रादेशिक पक्षांचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. (Which leaders will be present at the meeting convened by Sharad Pawar?)
सर्व विरोधक राष्ट्रमंचच्या बॅनरखाली एकत्र येणार असल्याचं सांगण्यात आलं. त्यानुसार आता मंगळवारी शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. दुपारी 4 वाजता ही बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आलीय. सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा पवारांचा अजेंडा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय. सुरुवातीला मोजक्या पक्षांसोबत पवारांची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर सर्वांना एकत्र कसं आणलं जाईल त्याबाबत सर्व नेते ठरवतील, अशी माहिती मलिक यांनी दिली आहे.
6 जनपथवरील बैठकीत कोणते नेते सहभागी होणार?
यशवंत सिन्हा पवन वर्मा संजय सिंग डी. राजा फारुख अब्दुल्ला न्यायमूर्ती ए. पी. सिंग जावेद अख्तर के. टी. एस. तुलसी करण थापर आषुतोश माजिद मेमन वंदना चव्हाण एस. वाय. कुरेशी के. सी. सिंग संजय झा सुरेंद्र कुलकर्णी कोलिन गोन्साल्विस अरुण कुमार घनश्याम तिवारी प्रितीश नंदी
सोनिया गांधींशी चर्चा करणार?
दरम्यान, उद्या होणाऱ्या बैठकीला काँग्रेसलाही आमंत्रित केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी पवार आज फोनवरून बोलून चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या शक्यता असल्या तरी उद्याच्या बैठकीवेळीच या बैठकीत कोणते राजकीय पक्ष सहभागी होतील हे स्पष्ट होणार आहे.
शरद पवारांचा हा काही पहिलाच प्रयत्न नाही – काँग्रेस
शरद पवार राजधानी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात 15 विरोधी पक्षांची मोट बांधत असल्याबाबत पटोलेंना पत्रकारांनी विचारलं. त्यावेळी पवार साहेबांचा हा काही पहिला प्रयत्न नाही. ज्या ज्या वेळी राजकीय समीकरण बदलतात, राजकारणात वेगळे वारे वाहू लागतात तेव्हा पवारांनी अशा भूमिका घेतलेल्या आहेत. त्यामुळे यात काही नवीन आहे असं म्हणणं चुकीचं असल्याचं पटोले यांनी म्हटलंय.
संबंधित बातम्या :
Which leaders will be present at the meeting convened by Sharad Pawar?