शरद पवारांकडून तेलंगणा सरकारचं कौतुक, दीड तासाच्या बैठकीत पवार आणि केसीआर यांच्यात कोणत्या विषयांवर चर्चा?

पवार आणि केसीआर यांच्यात जवळपास दीड तास बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, तेलंगणातील काही आमदार, खासदार आणि अभिनेते प्रकाश राजही उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना पवार यांनी तेलंगणा सरकारचं कौतुक केलं. तसंच बेरोजगारी आणि गरिबी यासह अनेक समय्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती पवारांनी दिली.

शरद पवारांकडून तेलंगणा सरकारचं कौतुक, दीड तासाच्या बैठकीत पवार आणि केसीआर यांच्यात कोणत्या विषयांवर चर्चा?
के. चंद्रशेखर राव, शरद पवार
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 7:18 PM

मुंबई : भाजपविरोधात तिसऱ्या आघाडीच्या निर्मितीसाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केसीआर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर केसीआर पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले. त्यावेळी पवार आणि केसीआर यांच्यात जवळपास दीड तास बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, तेलंगणातील काही आमदार, खासदार आणि अभिनेते प्रकाश राजही उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना पवार यांनी तेलंगना सरकारचं कौतुक केलं. तसंच बेरोजगारी आणि गरिबी यासह अनेक समय्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती पवारांनी दिली.

तेलंगणा सरकारचे पवारांकडून कौतुक

शरद पवार म्हणाले की, आम्ही राष्ट्रीय पातळीवरील पक्षांचे नेते एकत्र येतो तेव्हा नेहमी राजकीय विषयांवर चर्चा होते. मात्र आजची बैठक वेगळी होती. आजची बैठक यासाठी वेगळी होती की आज देशासमोर ज्या समस्या आहेत, मग ती बेरोजगारी, गरिबी, भूकबळी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा समस्यांवर सगळ्यांनी मिळून काय करायला हवं? आज आपली सगळ्यात महत्वाची जबाबदारी ही आहे, या महत्वाच्या विषयावर आज चर्चा झाली. आज विकासाचा मुद्दा महत्वाचा असल्यानं जास्त राजकीय चर्चा केली नाही. खास करुन देशात कुठेही नाही असे पाऊल तेलंगणात शेतकऱ्यांसाठी उचलण्यात आले आहे, तो एक रस्ता तेलंगनाने देशाला दाखवला आहे, अशा शब्दात पवार यांनी तेलंगणा सरकारचं कौतुक केलं आहे.

बेरोजगारी आणि गरिबी या समस्यांवर उपाययोजना करण्याची गरज

‘आज तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि त्यांचे सर्व खासदार, नेते आज आले होते. त्यांच्याशी केवळ विकासाच्या मुद्यावरच चर्चा झाली. आज गरिबी आणि बेरोजगारी या मोठ्या समस्येवर उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी बसून मार्ग शोधायला हवा. अशा विकासाच्या मुद्द्यावर एक वेगळं वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. त्यासाठी आम्ही सर्व मिळून पुन्हा कुठे बसायचं, कधी बसायचं याबाबत ठरवू’, असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

इतर बातम्या : 

‘देशात सुडाचं राजकारण वाढतंय, मग देशाला भविष्य काय?’, के. चंद्रशेखर राव यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांचा सवाल

Video | कानगोष्ट माईकने ऐकली! ‘नो क्वेशन आन्सर’ म्हणण्याची दुसऱ्यांदा वेळ का आली? लोकांचा राऊतांना सवाल

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.