पारनेरचा मुद्दा खूप छोटा प्रश्न, ‘मातोश्री’वर जाण्यात कमी पणा काय? : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात व्यापारी महासंघासोबत बैठक घेऊन विविध प्रश्नांचा आढावा घेतला. Sharad Pawar Pune press conference

पारनेरचा मुद्दा खूप छोटा प्रश्न, 'मातोश्री'वर जाण्यात कमी पणा काय? : शरद पवार
Follow us
| Updated on: Jul 07, 2020 | 7:08 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात व्यापारी महासंघासोबत बैठक घेऊन विविध प्रश्नांचा आढावा घेतला. या बैठकीनंतर पवारांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. यावेळी पवारांनी महाविकास आघाडीतील धुसफूस, पारनेर नगरसेवक फोडाफोडी, कोरोना संकट, याबाबत भाष्य केलं. (Sharad Pawar Pune press conference)

पारनेरचा मुद्दा खूप छोटा आहे, त्याचा राज्यावर काही परिणाम होणार नाही. तसंच मातोश्रीवर जाण्यात कमी पणा काय? असा सवाल शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारला.

शरद पवार काय म्हणाले?

कोरोना महामारीचा परिणाम आयुष्यावर झाला आहे. जबरदस्त किंमत मोजावी लागली. महाराष्ट्र, दिल्लीसह इतर राज्यांना फटका बसला. वेगवेगळ्या क्षेत्रावर परिणाम, पुणे हे औद्योगिक, आयटीसाठी महत्वाचे आहे. पुणे व्यापारी महासंघाच्या 82 संघटना आहेत. या क्षेत्रात आहेत. टिंबर, ऑटो, मशिनरी आणि इतर व्यापारी अशा 28 संघटना उपस्थिती होत्या. व्होलसेल व्यापारी चार हजार त्याचा परिणाम अर्थव्यवस्थांवर होतोय. तीन महिने मार्केट बंद असल्याने परिणाम झाला, असं पवार म्हणाले.

व्यापाराच्या विकेंद्रीकरणासाठी जमीन द्यावी

व्यापार शहरात केंद्रित असून तो विकेंद्रित करण्याचा विचार आहे. पुणे परिसरात सरकारने मोठी जमीन उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी आहे. पुढील विचार करुन सरकारनं काही हजार जमीन उपलब्ध करुन दिली तर इथला व्यापार शिफ्ट करण्याचा विचार आहे, रिंग रोड जवळ जागा असावी, मेट्रो असावी, कामगार राहण्याची सुविधाही करण्याचा विचार आहे, त्यासाठी मोठी जागा हवी आहे, असं शरद पवार म्हणाले.

मार्केट शिफ्ट करण्याचा विचार असून असं एक्झिबिशन सेंटर असावं अशी भूमिका आहे. सध्या मार्केट बंद असून काही दुकानांना परवानगी दिली, मात्र ग्राहकांना भीती असून प्रतिसाद कमी आहे. वेळेत सुधारणा हवीय, सरकारनं घातलेली बंधने स्वीकार करण्याची तयारी आहे, असं त्यांनी नमूद केलं.

कोरोना संकटाने तिजोरीवर आघात 

कोरोना संकट अस्वस्थ करणारे आहे, चिंताजनक आहे. परिस्थिती पालकमंत्री आणि अधिकारी, सरकार यांच्या कानावर घालून जागेची माहिती घेऊ. ही मागणी महत्वाची असून सर्व मदत सरकार करेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.

दुकाने बंद असताना वीज बिले येत आहेत, ही समस्या आहे, अर्थव्यवस्था पुनरुज्जीवन करणे कठीण आहे. स्थलांतर जागा ही ग्राहकांना योग्य असेल, पुणे आणि परिसरातून दळणवळण व्यवस्था महत्वाची आहे. राज्याची तिजोरी वर आघात झालाय, सरकार अर्थव्यवस्था परिणाम, नवे प्रकल्प थांबवण्याचा निर्णय, खर्च कमी करतोय, असं त्यांनी सांगितलं.

म्हणून मातोश्रीवर गेलो

महाविकास आघाडीत नाराजी असं म्हणत आहेत तसं काही नाही. राज्यातील समस्यांवर आम्ही चर्चा करतो. माझी मुलाखत संजय राऊत घेत असल्यामुळे मला जवळचं ठिकाण म्हणून मी ‘मातोश्री’वर गेलो होतो. मातोश्रीवर गेल्याने कमी पणा वाटतं नाही. चंद्रकांत पाटील यांना चिंता, मात्र मला त्यावर भाष्य करायचं नाही, असं शरद पवार म्हणाले.

मुख्यमंत्री घराबाहेर का नाहीत?

मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याने टीका होत असल्याबाबत शरद पवारांना विचारण्यात आलं. त्यावर पवारांनी महत्वाच्या लोकांनी, नेतृत्त्वाने बाहेर पडले की लोकं जमतात म्हणून ते टाळले जाते, इतर साधने उपलब्ध आहेत, असं सांगत मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली.

पारनेरचा मुद्दा छोटा

विरोधकांचं टीका करण्याचं काम आहे, मुख्यमंत्र्यांचं काम दिसत आहे, मात्र कोरोनामुळे प्राधान्य बदलले आहे, 14 ते पंधरा तास बैठक होतात, यावेळी टीका करु नये, बदलीबाबतचा काही मुद्दा नाही. पारनेर हा फार लहान प्रश्न आहे. तो काही राज्यस्तरावर परिणाम करणार प्रश्न नाही, असं शरद पवार म्हणाले.

गलवान खोऱ्यावर भाष्य

गलवान खोऱ्यात रस्ते बांधण्याचं काम सरकारचं आहे. तो आपल्या हद्दीत बांधला जातोय, पुढील संकटात हेलिकॉप्टर लँडिंग, रसद पाठवण्यासाठी महत्वाचं आहे, मी संरक्षण मंत्री असताना 1993 साली दोन्ही बाजूने सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला, त्याचबरोबर गोळीबार करायचं नाही हे ठरवलं, हा प्रश्न राजनैतिक मार्गाने सोडवणे गरजेचं आहे, जागतिक दबाव महत्वाचा आहे, या मार्गाने सैन्य माघार घेत असल्याचं दिसतंय, असं यावेळी शरद पवार यांनी सांगितलं.

Sharad Pawar Pune press conference

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.