महाराज, पाच रुपये घेऊन मठात बसा, राजकारणाच्या फंद्यात पडू नका : पवार
सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांवर झाडल्या जात असताना, यात आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडी घेतली आहे. त्यांनी भाजपचे सोलापुरातील उमेदवार डॉ. जयसिदेश्वर महाराजांवर निशाणा साधला आहे. “महाराज, तुम्ही पाच रुपये घ्या आणि मठात बसा. महाराज मंडळींनी राजकारणाच्या फंद्यात पडू नका.”, असा सल्ला शरद पवार यांनी डॉ. जयसिद्धेश्वर महाराजांना दिला […]
सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांवर झाडल्या जात असताना, यात आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडी घेतली आहे. त्यांनी भाजपचे सोलापुरातील उमेदवार डॉ. जयसिदेश्वर महाराजांवर निशाणा साधला आहे. “महाराज, तुम्ही पाच रुपये घ्या आणि मठात बसा. महाराज मंडळींनी राजकारणाच्या फंद्यात पडू नका.”, असा सल्ला शरद पवार यांनी डॉ. जयसिद्धेश्वर महाराजांना दिला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत शरद पवार बोलत होते.
“साधू-संत कुणाकडे काहीही मागत नाहीत. मागणारा कधीच संत होऊ शकत नाही. मात्र सोलापुरातील महाराज मते द्या म्हणून फिरत आहेत”, अशी टीका शरद पवार यांनी केली. मी कोणत्याच महाराजांचा अनादर करत नसल्याचं म्हणत, शरद पवारांनी पुढे लोकसभेत निवडून आलेल्या महाराज मंडळींचा चांगलाच समाचार घेतला.
भाजपने निवडणूक रिंगणात उतरवून आठ-दहा महाराज निवडून आणले. निवडून आणलेले महाराज भगवे घालून संसदेत बसले खरे, मात्र संसदेत एखादाही तोंड उघडले नसल्याची टीका पवारांनी केली.
55 मठ, 9 गुरुकुल, 200 एकर जमीन, शांतीगिरी महाराज लोकसभेच्या रिंगणात
सोलापुरातील महाराज मठात जायचं सोडून इकडे कुठे चाललात, असा टोलाही लगावला. “महाराजांना विचारल्यावर परमेश्वर की कृपा है, आज बेहत्तर है, कल या परसो बेहत्तर होगा, सबका कल्याण करेंगे, असे महाराज म्हणत आहेत. मात्र इकडे प्यायला नाही. तरुणांना नोकरी नाही, त्याचं काय?” असा सवाल शरद पवारांनी केला.
VIDEO : पाहा शरद पवार काय म्हणाले?