अनिल परबांचा गृहखात्यात हस्तक्षेप, देशमुखांची थेट तक्रार, शरद पवारांकडून उघड नाराजी

मुख्यमंत्र्यांकडे शरद पवारांनी व्यक्त केली नाराजी | Sharad Pawar shivsena

अनिल परबांचा गृहखात्यात हस्तक्षेप, देशमुखांची थेट तक्रार, शरद पवारांकडून उघड नाराजी
शरद पवार, उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 12:34 PM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या गृहखात्याच्या कारभारात शिवसेनेचे नेते अनिल परब (Anil Parab) यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे शरद पवार प्रचंड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनीच ही गोष्ट शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कानावर घातली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा मुद्दा मांडल्याचे समजते. (Sharad Pawar express displeasure about interference in home ministry by shivsena)

काही महिन्यांपूर्वी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य रंगले होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काढलेल्या आदेशाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली होती. त्यामुळे महाविकासआघाडीच्या गोटात सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली होती. अखेर शरद पवार, अजित पवार आणि अनिल देशमुख यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची समजूत काढली होती. या काळात गृह खात्यातील अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या अनेक बैठक अनिल परब यांच्या बंगल्यावर पार पडल्याचे समजते.

मात्र, आता अंबानी स्फोटक प्रकरणातील सचिन वाझेंच्या कथित सहभागानंतर अनिल देशमुख यांच्याकडून पुन्हा एकदा अनिल परब यांच्या गृहखात्यातील हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यावर काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनिल देशमुखांच्या प्रगती पुस्तकावर मुख्यमंत्री शेरा देतील : संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. एका एपीआयमुळे महाराष्ट्राचं सरकार (Maharashtra Government) अस्थिर होणार नाही. चंद्रशेखर यांचं दिल्लीतील सरकार दोन हवालदारांमुळे कोसळलं होतं, मात्र महाराष्ट्रात तसं काही होणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला. ते दिल्लीत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “एका एपीआयवरुन (Sachin Vaze) काय घडामोडी घडणार? काल याबाबत शरद पवारांनीही सांगितलंय. महाराष्ट्राचं सरकार स्थिर आहे. चंद्रशेखर आझादांचं सरकार दोन हवालदारांनी पाडलं होतं. दिल्लीत दारात उभे राहिलेल्या हवालदारांमुळे सरकार कोसळलं होतं. तसं महाराष्ट्रात सरकार अस्थिर झालंय या भ्रमातून बाहेर पडायला हवं”

मनसुख हिरेन आणि अंबानींच्या घराबाहेरील तपासाबाबत NIA, ATS तपास करत आहेत. केंद्रीय यंत्रणा तपास करत असताना हस्तक्षेप करण्यात अर्थ नाही. मात्र आमचं तपासावर लक्ष आहे, असं संजय राऊत यांनी नमूद केलं.

संबंधित बातम्या 

भाजप खासदार रामस्वरुप शर्मा यांचा संशायस्पद मृत्यू, दिल्लीतील घरात मृतदेह आढळला

Ambani Bomb Scare Case: सचिन वाझेंनी अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचा कट का रचला; NIA चा मोठा खुलासा

(Sharad Pawar express displeasure about interference in home ministry by shivsena)

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.