Girish Mahajan : शरद पवारांना शिवसेना संपवायची होती, गिरीश महाजन यांचं धक्कादायक वक्तव्य

भाजपचे नेते गिरीश महाराज यांनी आज धक्कादायक वक्तव्य केलंय. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना शिवसेना संपवायची होती, असा आरोप महाराज यांनी केलाय.

Girish Mahajan : शरद पवारांना शिवसेना संपवायची होती, गिरीश महाजन यांचं धक्कादायक वक्तव्य
गिरीश महाजन, शरद पवार
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 7:59 PM

मुंबई : भाजपचे नेते गिरीश महाजन म्हणाले, शिवसेनेनं भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. युतीत निवडून आलेत. पहिल्याच दिवशी सोडून गेलेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) लोकांच्या मदतीला जायचे. त्यामुळे त्यांच्यावर आमदारांचा विश्वास आहे. भाजप-शिवसेनेचा अडीच वर्षे फॉर्म्यूला झाला त्याचा मी साक्षीदार आहे. निकाल लागल्यावर मी फडणवीसांना भेटलो. मातोश्रीवर फोन केला. उद्धव ठाकरे अनेक सभांमध्ये होते. त्यावेळी ते का नाही बोलले नाहीत की, अडीच वर्षे आमचा मुख्यमंत्री (Chief Minister) राहील म्हणून. शाह बोलत होते की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. असं कुठेही झालं नाही की अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री राहील, असं कुण्या सभेत बोललं गेलंय. कुठेही बातमी नाहीय. उद्धव ठाकरे हे नंतर संधी साधून बोलतात. शरद पवार यांच्याशी त्यांचं साटलोट झालं होतं. ठाकरेंच्या बोलण्याला कोणताही बेस नाही. पण, शरद पवार यांना शिवसेना संपवायची होती. त्यांना माहिती होतं की ते मुख्यमंत्री झाले की सेना संपली. पवारांना माहिती होत ठाकरे यांना कोणती नगरपालिका (Nagarpalika) माहिती नाही, असंही गिरीश महाजन म्हणाले.

महाजन यांनी सोमय्यांवर बोलणं टाळलं

देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल गिरीश महाजन म्हणाले, मला वाटत नाही ते नाराज होते. कारण हे आधीच ठरलेलं, ते बाहेर राहणार होते. पण पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला. मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाने उपमुख्यमंत्री होणं आम्हाला योग्य वाटलं नाही. पण पंतप्रधानांचे फोन आले. हे राज्याच्या हिताचचं झालं. देवेंद्र फडणवीस अडीच वर्षे पक्ष संघटना वाढवणार होते. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबद्दल गिरीश महाजन म्हणाले, ती तांत्रिक बाब आहे. उद्धव ठाकरे आमच्यासोबत असते तर त्यांना सन्मान मिळाला असता. किरीट सोमय्यांवर मात्र महाजन यांनी बोलणं टाळलं.

संजय राऊतांनी शिवसेना संपविण्याची सुपारी घेतली

शिवसेनेतून 40 आमदार फुटणे ही मोठी गोष्ट आहे. संजय राऊत हे नेहमी शिव्या देत असतात. खरं तर मी आधीच बोललेलो की, संजय राऊत यांना सेना संपविण्याची सुपारी दिली आहे. ते ते बेछुट बोलायचे. त्याला लोकं पण कंटाळले. आता देवेंद्र फडणवीस- एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत. ते ठरवतील. जे काही होईल ते योग्य होईल. हे डबल इंजिनचे सरकार आहे, असंही गिरीश महाजन यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.